रक्षाबंधनला तीन हजार खात्यात जमा होणार

मुंबई : राज्य सरकारकडून ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा पहिला हप्ता कधी जमा होणार याबाबतची तारीख यापूर्वीच जाहीर करण्यात आली आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी राज्य सरकारकडून दोन महिन्यांची रक्कम एकदम जमा करण्यात येणार आहे.

लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत. योजनेची घोषणा झाल्यापासूनच अर्ज करण्यासाठी महिलांची झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले होते. सुरुवातील अर्ज करताना महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता, मात्र आता अनेक महिलांची अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

महाराष्ट्र रहिवासी, विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला, लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे, 60 वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल, असे योजनेचे निकष आहेत.

2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे, घरात कोणी कर भरत असेल, कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल, कुटुंबात पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल, कुटुंबातील सदस्यांकडे चार चाकी वाहन असेल तर (ट्रॅक्टर सोडून) अर्जदार योजनेस पात्र ठरणार नाहीत.