ठाणे : शहरातील कोरोना रूग्णवाढ मंदावली असली तरी आज दोन रुग्णांचा मृत्यू झाला. ही ठाणेकरांसाठी चिंतेची बाब आहे. तीन नवीन रुग्णांची भर आज पडली
आणि तेवढेच कोरोनामुक्त झाले. माजिवडे-मानपाडा, नौपाडा- कोपरी आणि दिवा प्रभाग समिती क्षेत्रात प्रत्येकी एक रूग्ण वाढला आहे. उर्वरित सहा प्रभाग समिती
परिसरात एकही रुग्ण आढळून आला नाही.
विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी तीन जण रोगमुक्त झाले. आत्तापर्यंत एक लाख ८१,५७२रूग्ण ठणठणीत बरे होऊन गेले आहेत तर ४५ जणांवर घरी आणि रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मागील दोन महिने एकाही मृत्यूची नोंद झाली नव्हती, परंतु काल एक आणि आज दोन रूग्ण दगावले आहेत. आत्तापर्यंत २१३०जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका प्रशासनाने काल शहरातील २६२ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये तीन जण बाधित सापडले. आत्तापर्यंत २४ लाख १०,५३९ नागरिकांची चाचणी घेण्यात आली असून एक लाख ८३,७४७ रूग्ण बाधित मिळाले आहेत