ठाणे : शहरात आज तीन नवीन कोरोना रूग्ण वाढले असून दोन जण रोगमुक्त झाले आहेत. हे नवीन रूग्ण फक्त माजिवडे-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात सापडले आहेत. उर्वरित प्रभाग समिती भागात एकही रूग्ण सापडला नाही.
विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी दोन रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८१,५५१जण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात आणि घरी दहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील ३८७ नागरिकांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये तीन जण बाधित मिळाले आहेत. आत्तापर्यंत २४ लाख ६,५९६ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ८३,६८८जण बाधित सापडले आहेत.