ठाणे : दरवर्षीप्रमाणे यंदाही बालदिनाचे औचित्य साधून येत्या १४ नोव्हेंबर रोजी राज्यपाल महामहिम भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे होणार आहे.
यंदाचा गंधार जीवन गौरव पुरस्कार उषा नाडकर्णी यांना तर गंधार गौरव पुरस्कार यांना जाहीर करण्यात आला आहे अशी माहिती ज्येष्ठ लेखक, दिगदर्शक अशोक समेळ यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. सकाळी ११ वा. कार्यक्रम होणार आहे. उषा नाडकर्णी आणि अतुल परचुरे यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल दोघांनी गंधारचे आभार मानले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रदीप ढवळ यांनी प्रास्ताविक केले आणि गंधारचे अध्यक्ष प्रा. मंदार टिल्लू यांनी संस्थेची माहिती दिली.