यंदाही करवाढ नसलेला नवी मुंबई मनपाचा अर्थसंकल्प सादर

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या सन 2023-24 चे सुधारित व सन 2024-25 चा मूळ अर्थसंकल्प नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सादर केला. नव्या जलस्त्रोत्रचा शोध घेत कल्याणकारी योजना, नव्या शैक्षणिक संकल्पानांचा प्रभावी वापर, त्याचप्रमाणे गतवर्षापासून रखडलेल्या नागरी विकास कांमाना पुर्ण क्षमतेने पुर्णत्वास नेण्याचा निर्धार करीत यंदाचा 1377.68 कोटीच्या आरंभीच्या शिल्लकेसह 4 हजार 950 कोटी जमा व 4 हजार 947 कोटी 30 लाख खर्चाचे आणि 2.70 कोटी शिलकेचा अर्थसंकल्प आयुक्त राजेश नार्वेकर यांनी विशेष समिती सभागृहात सादर करुन प्रशासकीय मान्यता दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, विजय कुमार म्हसाळ, शहर अंभियता संजय देसाई, परिवहन व्यवस्थापक योगेश कडुसकर आदि प्रशासकीय आधिकारी उपस्थित होते.
सन 2023-24 मधील 4 हजार 925 कोटीचा अर्थसंकल्पात  यंदा 25 कोटीनी आर्थिक रक्कमेत वाढ झाल्याचे अंदाजपत्रकात समोर आले आहे. पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी नवी मुंबईची निवासी योग्य उत्तम शहर ही प्रतिमा उंचवण्यासाठी शहर विकासाला गती देणारे विकास प्रकल्प राबविणे त्याचबरोबर उत्पन्नवाढीवर भर देणारा आणि गतीमान प्रशासनासाठी उपाय योजना करणारा जनता विकासाभिुमख सन 2024-25 चा अर्थसंकल्प सभागृहात मांडला. महानगरपालिकेने आगामी वर्षात 3 हजार 572 कोटी 30 लाख उत्पन्न विविध स्त्रोत्रामधून अपेक्षित धरण्यात आले आहे. वस्तू व सेवा करातून 1 हजार 626 कोटी, मालमत्ता करातून 900 कोटी, नगररचना शुल्क  300 कोटी, शासन अनुदान 244 कोटी, पाणीपट्टी व मोरबे प्रकल्पातून 104 कोटी, मुद्राकाशुल्कापोटी शासन अनुदान 90 कोटी, परवाना व जाहिरात शुल्कांतून 15 कोटी चे उत्पन्न, स्थानिक संस्था कर 50 कोटी, मलनिस्सारण 16 कोटी, महापालिका गुतवणुकीतील व्याजातून 100 कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत महसुलापोटी जमा होणार आहे. तर 4 हजार 947 कोटी 30 एकूण खर्चाचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे.
महापालिका आयुक्तांनी यंदाच्या अर्थसंकल्पात मागील रखडलेल्या विकास कामांना गती दिली आहे. त्यामध्ये ऐरोली चिंचपाडा व वाशी येथील नवीन बहुउद्देशीय इमारत, ऐरोली नाटयगृह, वाशी बस स्थानकांतून वाणिज्य संकुल, एमआयडीसी क्षेत्रात 15  किलोमीटरचे रस्ते उभारणे, ऐरोली कटाई उन्नत मार्ग, तुर्भे रेल्वे स्थानकांनजीक जोड पुल, जुईनगर कारशेड पुल, नेरुळ येथील सायन्स पार्क, भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्राची क्षमता वाढवून शहराचे भविष्यातील पाणी नियोजन, सानपाडा सेक्टर 11 येथील 33.31  कोटी खर्चुन सेंट्रल लायब्ररी उभारणे, 540 कोटी खर्चातून घणसोली-ऐरोली जोड खाडी पुल व रस्ता, बेलापुर नेरुळ यादवनगर कुकशेत येथे नव्या वर्षात चार महापालिकेच्या नव्या शाळा उभारणे, शहरातील विद्याुत स्मशनभूमी उभारणे त्याचप्रमाणे आरोग्यविषयक उपक्रमांत एमआरआय मशीन, अत्याधुनिक शस्त्रक्रिया केंद्र उभारणे, ई हॉस्पिटल, मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळा आणि मेमोग्राफी सुविधा उभारणे व त्याचप्रमाणे कोपरखैरणे व बेलापुर बस स्थानकांचा वाणिजय वापरांचा विकास संकुल उभारणे अशा कामांना सन 2024-25 मध्ये पुर्णत्वास नेण्यासाठी आयुक्तांनी लक्ष ठेवले आहे.