ठाणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यामार्फत बारवी गुरुत्व जलवाहिनीचे देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने गुरुवार १० रोजी रात्रौ १२ ते शुक्रवार ११ फेब्रुवारी, २०२२ रोजी रात्रौ १२ वाजेपर्यंत ठाणे शहरातील दिवा प्रभाग समिती, मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत मुंब्रा बायपास पासून मुंब्रा फायरब्रिगेड पर्यंत (किस्मत कॉलनी, चांद नगर, एम. एम.व्हॅली, अमृतनगर, अल्मास कॉलनी) तसेच कळवा प्रभाग समितीमधील काही भाग व कोलशेत, वागळे इस्टेटमधील काही परिसराचा पाणी पुरवठा २४ तासांसाठी बंद राहणार आहे.
या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.