जिल्हाधिकाऱ्यांचे संबंधितांना आदेश
ठाणे: जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघात किमान साठ हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्याने शासकीय तसेच निम शासकीय कर्मचारी-अधिकाऱ्यांना मतमोजणी होईपर्यंत सुट्टी देण्यात येऊ नये, असे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले आहेत.
लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी आणि कल्याण या तीन लोकसभा मतदार संघात २० मे रोजी मतदान होणार आहे. त्याकरिता किमान साठ हजार कर्मचारी-अधिकाऱ्यांची आवश्यक असून जिल्ह्यातील निवडणूक पारदर्शक आणि सुरळीत पार पदाण्यासाठी कर्मचारी अधिकारी मोठ्या प्रमाणावर लागणार आहेत त्यामुळे जिल्ह्यातील राज्य, केंद्र, निम सरकारी, महामंडळ, अनुदानित तसेच विना अनुदानित शाळा महाविद्यालयातील शिक्षक आणि बँक कर्मचाऱ्यांना दीर्घ मुदतीची सुट्टी देऊ नये, असे आदेश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले आहेत. या कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षण देण्यात येणार आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांची गरज असल्याने सर्व आस्थापना प्रमुखांनी याची नोद घ्यावी, असे आदेशात म्हटले आहे.