कोळेगाव नाका ते मानपाडा रस्त्याच्या कॉक्रीटीकरणाचे काम लागणार मार्गी; खा. डॉ. श्रीकांत शिंदें यांच्या मागणीला यश

कल्याण: कोळेगाव नाका ते मानपाडा मुख्य रस्त्यापर्यंत विस्तारित असेलेला भाग हा पूर्ण करण्यात यावा, अशी मागणी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीए आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांना केली होती. अखेर या कामाला मंजुरी देण्यात आली असून २ कोटी १७ लाखांची निविदा प्रक्रिया नुकतीच पूर्ण करण्यात आली. आता लवकरच या रस्त्याचे काम सुरू होणार आहे.

डोंबिवली शहराच्या अंतर्गत वाहतुकीसाठी महत्त्वाचे असलेल्या कोळेगाव घेसर रस्त्याचे कॉंक्रिटीकरण नुकतेच पूर्ण करण्यात आले. या कामामुळे या मार्गवरील प्रवाशांना पर्यायी मार्ग उपलब्ध झाला आहे  मात्र या रस्त्याचे काम कोळेगाव ते मानपाडाच्या कल्याण-शीळ या मुख्य रस्त्यावरपर्यंत करण्यात यावे, अशी मागणी कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांच्याकडे केली होती. या मागणीला मंजुरी देते एमएमआरडीएने दोन कोटी 17 लाखांची निविदा प्रक्रिया राबवली होती. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता लवकरच या रस्त्याचे काम सुरू केले जाणार आहे. हा रस्ता पूर्णपणे कॉक्रीटीकरण झाल्यास काटई जंक्शनला जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूककोंडी कमी होणार आहे. तर नवीन कनेक्टिव्हिटी तयार होण्यास मदत होईल. तसेच स्थानिक नागरिक आणि प्रवाशांना मोठ्या वाहतुकीवेळी दिलासा मिळणार आहे.