ठाणे: भिवंडी येथिल खाडीपार भागात इमारतीचा सज्जा कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.
खाडीपार येथील गौसिया माजिद भागात १५ वर्षे जुनी तळ अधिक एक मजली अब्दुल फकी इमारत आहे. आज दुपारी १.१५ च्या सुमारास या इमारतीच्या आडोश्याला श्रीमती शाईनज अन्सारीन(५२) ही महिला उभी असताना पहिल्या मजल्याच्या सज्जाचा काही भाग या महिलेच्या अंगावर पडला. यात ती गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.
याबाबतची माहिती भिवंडी अग्निशमन दलाच्या जवानांना समजताच ते एक फायर व्हॅन, रूग्णवाहिका आणि पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी त्या महिलेचा मृतदेह पुढील कारवाईसाठी इंदिरा गांधी रुग्णालयात पाठवला आहे.