उंबर्डे कचरा प्रकल्पातील कचरा पेटला

परिसरात धुराचे साम्राज्य 

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या कल्याण पश्चिमेकडील उंबर्डे येथील कचरा प्रकल्पातील कचऱ्याला बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. उंबर्डे येथील प्रकल्पात ओला कचऱ्याचे विघटन केले जाते.

दुपारी तीनच्या सुमारास कचऱ्याला  लागलेल्या आगीने क्षणार्धातच रौद्ररूप धारण केलं. आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले दोन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असलं  तरी सध्या धुराचे लोट हे परिसरात पसरले आहेत. आगीच कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आले.

अग्निशमन दलाच्या सहा बंब तसेच पाच पाण्याचे टँकरच्या साहयाने आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलांच्या जवानांना यश मिळल्याची माहिती प्रमुख अग्निशमन आधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली. आधारवाडी डपिंग च्या आगीच्या गत घटना पाहता उंबर्डे कचरा प्रकल्पाला यापूर्वी आग लागल्याची घटना घडली असल्याने यावर ठोस उपाययोजना होणे गरजेचे असल्याचे चित्र यानिमित्ताने दिसत आहे.