वर्सोवा पुल नवीन वर्षात खुला होणार

खासदार राजन विचारे यांनी केली पाहणी

ठाणे : मुंबई-सुरत जोडणारा चार मार्गिकांचा वर्सोवा पूल २० फेब्रुवारीपर्यंत खुला होण्याची शक्यता आहे. खासदार राजन विचारे यांनी आज पुलाची पाहणी केली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.

पुलाची पाहणी करण्याकरिता राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प अधिकारी मुकुंदा अत्तरडे, वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त प्रकाश गायकवाड, वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे, जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, नरेश मणेरा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता कांबळे, गटनेते नीलम ढवण, शहर प्रमुख लक्ष्मण कांदळगावकर, जयराम मेसे, शिवशंकर तिवारी, जितेंद्र पाठक, ग्राहक कक्षाचे सदानंद घोसाळकर व इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ वरील वर्सोवा येथील धोकादायक झालेल्या पुलाची तात्पुरती डागडुजी करून त्याठिकाणी ९७० मी. लांबीचा ४ लेन असलेल्या नवीन पुलाचे काम पूर्णत्वास येत आहे. त्याठिकाणी फक्त पूल जोडण्याचे काम बाकी आहे. एकूण मार्ग २.२५ किमीचा आहे.
या वर्सोवा पुलाच्या कामाचे ११ जानेवारी २०१८ रोजी भूमिपूजन होऊन सुद्धा या कामास सुरुवात करण्यात आली नव्हती. त्यासाठी वन खात्याच्या परवानग्या मिळवून घेण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेऊन व संसदेत सतत पाठपुरावा आणि पत्रव्यवहार सुरु होता. २९ एप्रिल २०१९ रोजी वन खात्याच्या अंतिम परवानग्या प्राप्त झाल्यानंतर या कामाला सुरुवात करण्यात आली.

कोविडमध्ये सुद्धा या रस्त्याच्या मार्गिकांचे काम सुरू ठेवण्यासाठी खासदार राजन विचारे पाठपुरावा करीत होते. आज त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून या पुलामुळे मुंबई, ठाणे तसेच सुरतकडे जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीतून सुटका मिळून त्यांचा प्रवास सुखकर होणार आहे. या मार्गावरून (पी सी यु) पॅसेंजर कार युनिट च्या अहवालानुसार या मार्गावरून दररोज सव्वा लाख गाड्या ये-जा करीत आहेत.