ठाणे: सार्वजनिक ठिकाणी तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या ठाणे महापालिकेतील सफाई कामगारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे नगर पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई राकेश येशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार्भ गुन्हा ठाणे नगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात्वाला आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १२ मार्च २०२५ रोजी रात्री पावणे एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार नागसेन नगर, खारटन रोड येथे वाढदिवसानिमित्त सफाई कामगार मुकेश गेहलोत याने तलवारीने केक कापला. याबाबत व्हिडिओ देखील वायरल झाला आहे. ही बाब खरी असल्याची माहिती श्री.येशी यांनी वरिष्ठांना दिली.
या प्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विनापरवाना तलवार हातात घेऊन घोषणा देऊन, गाणी वाद्य वाजवून पाच किंवा त्यापेक्षा जास्त अधिक लोकांना एकत्र जमवून मनाई आदेशाचा भंग केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.