मुख्यमंत्र्यांचे हस्ते लोकार्पण
ठाणे : शिळफाटा जंक्शनवर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या पनवेलकडे जाणा-या मार्गिकेचे मुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी, १३ फेब्रुवारी रोजी लोकार्पण केले.
पनवेलकडे जाणा-या या उड्डाणपुलाच्या या भागात तीन मार्गिका आहेत. त्यामुळे मुंब्रा दिशेला जाणारी बाजू सुमारे पुढील दोन महिन्यांत खुली करण्यात येईल. या उड्डाणपुलावर एकूण तीन अधिक तीन मार्गिका असून त्यांची एकूण रुंदी 24 मीटर आहे. पुलाची एकूण लांबी 739.5 मीटर आहे. पुलाच्या ‘व्हायाडक्ट’ची लांबी 300 मीटर असून, तर मुंब्रा बाजूकडे (अ1) आणि पनवेल बाजू (अ2) कडे जाणारी मार्गिका अनुक्रमे 271.5 मीटर आणि 168.0 मीटर लांबीच्या आहेत.
या पुलाच्या निर्मितीसाठी 30 महिन्यांचा कालावधी लागला आहे. प्रकल्पाची अंदाजित किंमत सुमारे 45.68 कोटी आहे. मुंबई आणि आसपासच्या भागातील वाहतूक कोंडी कमी होण्याकरीता प्राधिकरणाचे उद्दीष्ट आहे.
या पुलामुळे राष्ट्रीय महामार्ग 48 वरील ठाणे आणि जेएनपीटी दरम्यानची वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होईल. या मार्गाचा वापर केल्यामुळे प्रवाशांचा वेळ, पैसा आणि इंधनाची बचत होण्यास मदत होईल. “एमएमआरडीएने वेळोवेळी महत्वाकांक्षी आणि नावीन्यपूर्ण असे विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. पायाभूत सुविधांचा विकास करताना शाश्वततेची कास प्राधिकरणाने धरली आहे. पायाभूत सुविधांचा शाश्वत विकास करण्यात एमएमआरडीएने मोठी आणि यशस्वी झेप घेतली आहे. प्राधिकरणाला सातत्याने पाठबळ देणे हे यामुळेच सुखावणारे आहे. या क्षणाचा साक्षीदार होताना मला फार आनंद होत आहे, असे श्री. शिंदे म्हणाले.
हा पूल एमएमआर क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचे लोकार्पण करताना मला फार आनंद झाला आहे. मुंबई महानगर क्षेत्राचा शाश्वत विकास होण्यासाठी प्राधिकरण सातत्याने प्रयत्न करत आहोत. या प्रयत्नांना आम्ही सातत्याने पाठबळ देत आलो आहोत याचे मला समाधान आहे, असे ते म्हणाले.
राष्ट्रीय महामार्ग 48 वर उभारलेला शिळफाटा उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल आणि सोबतच इंधनाचीही बचत होईल, अशी माहिती एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांनी दिली.