आनंदी, सुखी आणि संपन्न जीवनाचा शोध संपतो ठाण्यात !

ठाणे हे घर घेण्यासाठी ग्राहकांची पहिली पसंती असलेलं शहर आहे. ठाण्यात सुरू असलेले मेट्रो प्रकल्प, ठाणे-पनवेल ट्रान्स हार्बर यांमुळे दळणवळणासाठी सर्वात जास्त उपयुक्त ठरणारे असे मध्यवर्ती शहर म्हणून ठाण्याकडे बघितले जाते. ठाणे शहराचा विकास झपाट्याने होत आहे. ठाणे शहर आता उत्तमोत्तम गृहप्रकल्पांसाठी योग्य म्हणूनही ओळखले जात आहे. कायम वास्तव्यासाठी आणि गुंतवणुकीसाठीही ठाण्यात उत्तम गृहप्रकल्प उपलब्ध होत आहेत. क्रेडाई एमसीएचआय ठाणेचे सचिव मनीष खंडेलवाल यांनी गेल्या दशकात ठाणे शहराची वाढ पाहिली आहे. त्यामुळे आता ठाणे शहराचा भविष्यातील ट्रेंड कसा असेल हे त्यांनी प्रॉपर्टी तज्ज्ञ कमलेश पांड्या यांच्याशी संवाद साधताना सांगितले.

भविष्यातील ट्रेंड बद्दल काय सांगाल ?
ठाण्यात रिअल इस्टेट क्षेत्रातील वाढीसाठी अनेक नवे पैलू आहेत. आयटी पार्क हा महत्वाचा घटक असून येथे व्यवसायाच्या संधी, मोठे व्यावसायिक, आंतरराष्ट्रीय कंपन्या यामुळे ठाणे हे एक मोठे बिझनेस हब बनले आहे. त्यात अनेक पंचतारांकित हॉटेल्स, व्यावसायिक पार्क्स, नवीन मॉल्स, नवीन पायाभूत सुविधा, हॉस्पिटॅलिटी या सुविधा आहेत. याचा नजीकच्या भविष्यात मोठा प्रभाव दिसणार आहे. दुसरे म्हणजे विकासामुळे सर्व प्रकारच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. उच्चशिक्षित लोकांना नोकरीसाठी ठाण्याबाहेर जाण्याची गरज नाही. त्यामुळे काम आणि मुक्काम एकाच ठिकाणी होईल. ठाण्याचा विकासदर मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात सर्वात वेगवान आहे. शहराच्या विकासाचे नियोजन, विकास आणि अंमलबजावणी योग्य प्रकारे होत आहे. त्यामुळे हे शक्य आहे.

मुंबई महानगर प्रदेशात घर शोधणाऱ्यांसाठी ठाणे आदर्श शहर का आहे?
पायाभूत सोयीसुविधांबरोबरच आधुनिक जगात वावरण्यासाठी लागणारे घटक सामावल्याने ठाणे शहर हे घर घेणाऱ्यांसाठी उत्तम आहे. ठाणे हे सुरक्षित शहर आहे, ज्यामध्ये अनेक उत्तम रुग्णालये, शाळा, मंदिरांसह प्रार्थनास्थळे आहेत. शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स तसेच नोकरीच्या ठिकाणी सण आणि सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात. या सर्व गोष्टी येथे असल्याने प्रामुख्याने 20 ते 40 वर्षे वयोगटातील तरुण ठाण्यात घर घेण्यासाठी पहिली पसंती देतात.

पायाभूत सुविधा शहरातील रिअल इस्टेटच्या वाढीसाठी कारणीभूत आहे का?
पायाभूत सुविधांची वाढ झाल्यामुळे रोजगाराच्या संधीही वाढल्या आहेत, त्या भविष्यात अनेक पटींनी वाढणार आहेत. ‘न्यू एज बिझनेस एन्टरप्रायझेस’ची वाढ नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करते, जी प्रदूषण न करणाऱ्या उद्योगांमधील आहेत. रोजगार निर्मितीप्रमाणे, ठाण्यात केवळ व्यापारी किंवा व्यावसायिकच वाढताना दिसत नाहीत, तर सीए, वकील, वास्तुविशारद इत्यादी व्यावसायिकही आहेत ज्यांनी ठाण्यात विकासाचा पाया रोवला आहे. हे सर्व ठाण्याच्या रिअल इस्टेटच्या वाढीचे चालक आहेत.

शहरात काय बदल होतील असे तुम्हाला वाटते?
पुनर्विकास हा ठाण्यातील रिअल इस्टेटमधील एक विभाग आहे ज्यामध्ये प्रचंड क्षमता आहे. ठाण्यात मोठ्या प्रमाणात पुनर्विकास होईल, त्यामुळे ठाण्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. त्याचा शहराच्या देखाव्यावर सकारात्मक परिणाम होईल. शहराचे क्षितिज बदलेल, त्याला एक नवीन रूप देईल.

ठाणे हे शहर म्हणून विलक्षण वेगाने वाढण्याचे कारण काय?
ठाण्यातील अधिकारी मग ते ठाणे जिल्हाधिकारी असोत, ठाणे महानगरपालिका आयुक्त असोत तसेच ठाणे पोलीस आयुक्त असोत. हे अधिकारी सध्याचे असोत किंवा गेल्या काही वर्षांतील – सर्वजण शहराच्या विकासाच्या योजनांबाबत अत्यंत सकारात्मक आहेत. राजकीय क्षेत्रातील नेत्यांनीही सकारात्मक विचार आणि दृष्टीकोन दाखवला. त्याचा परिणाम म्हणजे गेल्या दोन दशकांत ठाणे शहर दहा पटीने वाढले आहे.

यशस्वी प्रॉपर्टी हबची व्याख्या कशी करता?
ठाणे हे आदर्श उदाहरण आहे. मुंबई महानगर प्रदेशाला यशस्वी मालमत्ता केंद्र बनवणारी अनेक कारणे आहेत. ठाणे हे एक कॉस्मोपॉलिटन शहर आहे जे सुरक्षित आहे. येथील नागरिक ध्येय साध्य करणारे आहेत. कमाईतील वाढ, मग तो व्यवसाय असो, पगार असो किंवा वैयक्तिक उत्पन्नात झालेली वाढ पाहता, सरासरी ठाणेकरांचा अतिरिक्त पैसा वाढला आहे. त्यामुळे ठाणे हे विकासाभिमुख शहर बनले आहे. त्यामुळे नवीन व्यवसाय सुरू झाले आहेत, त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे ठाण्यात नवीन कंपन्या दाखल होत असल्याचे आपण पाहत आहोत. जेव्हा आपण या उपलब्धींचा विचार करतो आणि ठाणेकरांच्या खरेदी शक्तीचा विचार करतो, तेव्हा ते नवीन घरांच्या वाढत्या मागणीमध्ये देखील अनुवादित होते.

केवळ मालमत्तेपलीकडे, ठाणे शहर देत असलेली जीवनशैली किती महत्त्वाची आहे?
याचा संबंध ठाणेकरांच्या कमाई क्षमतेशी आहे. नोकरीच्या संधी दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे ठाणे शहरात एक चांगले राहणीमान उपलब्ध झाले आहे. जे ठाण्यात राहतात आणि काम करतात त्यांचा प्रवासाचा वेळ वाचतो, तो वेळ कुटुंब, नातेवाईक आणि मित्रांसोबत घालवला जातो. परिणामी, शहरातील रहिवासी ‘नेहमी हसतमुख’ दिसतात.

ठाण्यात घर हा पर्याय योग्य आहे का ?
येथे कनेक्टिव्हिटी उत्कृष्ट आहे. त्यामुळे ठाणे शहर हे राहण्यासाठी एक आदर्श ठिकाण बनले आहे. ठाणे शहराचा पुनर्विकास अतिशय वेगाने सुरू आहे. यामुळे ठाण्याचा विकास इतर कोणत्याही शहराच्या तुलनेत जलद गतीने होईल याची खात्री आहे. ठाणे शहराचे क्षितिज बदलत आहे. मोठमोठ्या गगनभेदी इमारती तयार होताना आपण पाहत आहोत. म्हणूनच राहण्यासाठी, काम करण्यासाठी आणि जीवनाचा आनंद घेण्यासाठी ठाणे हे उत्तम ठिकाण आहे.

 
कमलेश पांड्या 
प्रॉपर्टी तज्ज्ञ