कल्याण : शहर आणि बापगाव यांना जोडणाऱ्या गांधारी खाडी पुलावरच्या रस्त्याची दुरवस्था पाहता वाहनांच्या रहदारीच्या दृष्टीकोनातून पुलावरील रस्त्याची लवकरच दुरूस्ती होऊन पुलावरील रस्ता कात टाकणार आहे.
हा टू वे गांधारी पुल मेजर ब्रीज प्रकार असून या पुलाची लांबी २५० मीटर असून रूंदी साडेसात इतकी आहे. गांधारी पुलावरील काँक्रीट रस्त्याची दुरावस्था झाली होती. पुलावरील एँक्सोटेक्शन् एकुण ८ जॉईंट पैकी खराब झालेल्या एँक्सोटेक्शन् जॉईंटच्या दुरूस्तीसह काँक्रीटकरणाचा लेअर स्क्राँपिग करून नव्याने रस्त्याचे डांबरीकरण सुमारे २० लाख निधीच्या तरतूदीतून करण्यात येणार आहे. पुलावरील पाणी जाण्याचे मार्ग मोकळे करण्यात येणार असल्याने पुलाच्या रस्त्यावरील पाण्याचा निचारा होऊन पावसाळ्यात पुलावरील रस्ता सुस्थितीत राहील.
संदर्भीत पुलावरील रस्त्याच्या कामामुळे वाहतूक कोंडी न होण्यासाठी ट्राफिक वार्डनच्या खर्चाची व्यवस्था केली असून पोलीस प्रशासनाची परवानगी मिळाली आहे. अवजड वाहनांची वाहतूक परस्पर वळवण्याचे नियोजन असून हलक्या वाहनांची वाहतूक दुरूस्ती दरम्यान सोडत एक लेन सुरु ठेऊन दुसऱ्या लेनचे पुलाच्या रस्त्याचे काम करून दोन्ही लेनचे दुरूस्ती सह डांबरीकरणाचे काम जास्तीत जास्त रात्रीच्या वेळेत करण्याचे नियोजन असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग कल्याण उपविभागीय अभियंता संपदा मोहरीर यांनी दिली.
लवकरात लवकर महिन्याभरात पुलाच्या रस्त्याचे दुरूस्तीसह डांबरीकरण करून पुलावरील रस्ता सुस्थितीत करून वाहनांची रहदारी सुरळीत करण्याचे नियोजन असल्याचे सहाय्यक अभियंता श्रेणी -२ अनिल पवार यांनी संपर्क साधला असता सांगितले.