ठाणे : शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा किंचित कमी झाला आहे. आज २८ नवीन रूग्ण सापडले. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.७४ टक्के इतके झाले आहे.
विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी ६६जण रोगमुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ९३,९९१जण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात आणि घरी ३०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज एकही रूग्ण दगावला नसून आत्तापर्यंत २,१५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील ५९८ नागरिकांची चाचणी घेतली होती. त्यामध्ये २८जण बाधित मिळाले आहेत. आत्तापर्यंत २५ लाख २१,२१८ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ९६,४५७ रूग्ण बाधित सापडले.