वृद्धेने दोन लाख किमतीचे सोन्याचे ब्रेसलेट केले परत

कल्याण : कल्याण पश्चिमेत गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास दोन लाख रुपये किमतीचे तब्बल तीन तोळ्याचे सोन्याचे ब्सलेट झ रे ाडू सुपे विक्री करून आपली गुजराण करणाऱ्या ६० वर्षीय वृध्देला सापडले असता वाहतूक शाखेच्या पोलिस हवालदाराच्या निदर्शनास आणून देत आपला प्रामणिकपणा दाखविला. वाहतूक पोलिसांनी शाहनिशा करीत ज्याचे सोन्याचे ब्रेसलेट हरविले होते. त्यांचा शोध घेत त्यांना ब्रेस्टलेट परत के ल्याची सुखद घटना घडली.

गुरूवारी सकाळी १० च्या सुमारास महात्मा फु ले चौक कल्याण पश्चिम येथे कारचालक संके त संजय ढेरंगे हे नाश्ता करत असताना त्यांचे हातातील तीन तोळे वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट किं मत सुमारे दोन लाख रुपये हे खाली पडून गहाळ झाले. ते महात्मा फु ले चौकात झाडू सुपडे विक्री करणारी महिला जाहिदा शेख ईसार वय ६० वर्षीय वृध्देस सापडले. त्यांनी आपला प्रामाणिकपणा दाखवून सदर बाब ड्युटीवरील वाहतूक अं मलदार पो. हवालदार विठोबा बगाड, बाळू सावकारे, वार्डन सत्यजित गायकवाड, संतोष घोलप यांना सांगितली. त्या अनुषंगाने पोलीस अं मलदार व वार्डन यांनी सदर कार चालक संके त ढेरंगे यांचा शोध घेऊन त्यांना त्यांचा किमती ऐवज तीन तोळे वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट परत के ले.

झाडू विकणारी महिला जाहिदा निसार शेख यांचा प्रामाणिकपणा खरोखरच कौतुकास्पद प्रशंसनीय आहे. त्याबद्दल जहिदा शेख व पोलीस अं मलदार यांचा सत्कार कल्याण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी केला.