गृहसंकुलांना द्यावी लागणार माहिती
ठाणे : ठाणे शहरात जवळपास चार हजार पाळीव कुत्र्यांची वाढ ठाणे शहरात झाल्याचा अंदाज पालिकेच्या पशु वैद्यकीय विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात विरंगुळ्याचे साधन म्हणून पाळीव कुत्रे पाळण्यामध्ये नागरिकाचा कल ं दिसून आला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात आजच्या घडीला साडेचार हजार नागरिकांनी पशु वैद्यकीय विभागाकडून घरामध्ये कु त्रा पाळण्यासाठी परवाना घेतला आहे. घरामध्ये कु त्रा पाळण्यासाठी या विभागाकडून परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले असल्याने हा परवाना घेतल्यानतरच ं घरामध्ये कु त्रा पाळता येणार आहे. शहरात नेमके किती पाळीव कु त्रे आहेत याची माहिती घेण्यास सुरुवात के ली आहे. पूर्वी घरोघरी जाऊन पाळीव कु त्र्यांची माहिती घेतली जात होती. तर कु त्र्यांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून ही माहिती घेतली जात होती. मात्र कोरोना काळानंतर प्रत्येकाच्या घरी जाऊन माहिती घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे ही माहिती घेण्यासाठी आता गृहसंकु लांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आपापल्या गृहसंकु लामध्ये कोणत्या फ्लॅटमध्ये कु त्रा पाळण्यात आला आहे याची माहिती पालिके च्या पशु वैद्यकीय विभागाला कळवावे लागणार आहे.
ठाणे महानगरपालिके च्या आरोग्य विभागाने ठाणे शहरातील सोसायट्यांना नोटीस देऊन सोसायटीमध्ये पाळीव प्राणी, त्याच्या मालकाचे नाव आणि इतर माहिती देण्याचे करण्याचे निर्देश दिले आहेत.पाळीव प्राण्याचा परवाना न घेतल्यास पाळीव प्राण्यांच्या मालकावर दंडात्मक कारवाई के ली जाईल, असा स्पष्ट इशारा नोटीसमध्ये देण्यात आला आहे. ठाणे महापालिके चे उपायुक्त मनीष जोशी यांनी नवीन नियमानुसार परवाना घेणे आवश्यक असून, ज्यांनी परवाना घेतला आहे त्यांनी नवीन नियमानुसार परवाना नूतनीकरण करून घेणे आवश्यक असल्याचे पालिके च्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.