दारूविक्री-मद्यसेवनाच्या ठिकाणांना महापुरुषांची नावे नकोत

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील सर्व दुकाने व व्यापारी आस्थापनांनी आपल्या आस्थापनांच्या नावाचे फलक इतर भाषेबरोबरच मराठी भाषेमध्ये देवनागरी लिपीत असणेअनिवार्य आहे. तसेच मद्यविक्री व मद्यपान सेवन करणाऱ्या आस्थापनांना कोणत्याही गडकिल्ल्यांची अथवा महापुरुषांची नावे देता येणार नाहीत, अशा सूचना कामगार उपायुक्त कार्यालयाने दिल्या आहेत.

कामगार उपायुक्त कार्यालयाने काढलेल्या परिपत्रकाद्वारे या सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्र दकु ाने व आस्थापना अधिनियम 2017 च्या कलम 35 अन्वये आस्थापनेच्या
नावाचा देवनागरी लिपीतील मराठी भाषेचा फलक प्रदर्शित करणे बंधनकारक असून सदरचा फलक प्रदर्शित करताना मराठी भाषेतील या नामफलकावरील शब्दांचा आकार हा इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये. तसेच मद्यविक्री किं वा मद्यपान सेवा देणाऱ्या आस्थापनेस महापुरुषांची किं वा गडकिल्ल्यांची नावे देता येणार नाहीत, असेही या अधिनियमामध्ये तरतूद करण्यात आली आहे. पूर्वी या तरतुदी दहापेक्षा जास्त कामगार असलेल्या आस्थापनांसाठी लागू होत्या. मात्र, आता शासनाने 17 मार्च 2022 रोजी या अधिनियमात सुधारणा के ल्या असून अधिनियमातील कलम 6 अं तर्गत नोंदणीकृ त असलेल्या आस्थापना व कलम 7 नुसार सूचना पत्रे देणाऱ्या सर्व आस्थापनांनाही वरील तरतुदी लागू होतात. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील सर्वदकाने व आस् ु थापनाच्या मालकांनी आपल्या दुकानांची व आस्थापनांची नावे मराठी भाषेत देवनागरी लिपीत प्रदर्शित करावीत. तसेच मद्यविक्री व मद्यसेवा करणाऱ्या आस्थापनांनी महापुरुषांची अथवा गडकिल्ल्यांची नावे देऊ नये, अशा सूचना कामगार उपायुक्त कार्यालयाने के ल्या आहेत.