अंबरनाथ : यंदा पावसाळा उशिरा सुरु झाला असला तरी गेल्या काही दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने धरण क्षेत्रात चांगली हजेरी लावली आहे. अंबरनाथच्या पूर्व भागाला पाणी पुरवठा करणारे चिखलोली धरण आज भरून वाहू लागले आहे.
मागील वर्षी २४ जुलै २०२१ रोजी धरण भरून वाहू लागले होते. यावर्षी १० दिवस आधीच धरण भरून वाहू लागल्याने पूर्व भागाची पाण्याची काळजी दूर झाली आहे. या धरणातून शिवाजीनगर , महालक्ष्मीनगर, वडवली आदी भागाला पाणी पुरवण्यात येते.