मुंबई : महायुतीच्या घटक पक्षांतील खातेवाटपाचा तिढा दिल्लीत सुटल्याची माहिती मिळत आहे. भाजपला 20, शिवसेना 12 तर राष्ट्रवादीला 10 मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सहा आमदारांमागे एक मंत्रिपद असा फॉर्म्युला असल्याचे बोलले जात आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचा वरचष्मा राहणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. नंबर एकची सर्व खाती भाजपकडे राहणार आहेत. गृह व अर्थ खाते भाजपकडेच राहणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. नगरविकास खाते शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीच्या पदरात महसूल खातं पडण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम खातेही सोडण्याची भाजपची तयारी आहे. एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासोबत अंतिम चर्चा झाल्यावर अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.