सिएटच्या वेगापुढे मटेरीयल ऑर्गनायझेशन गडगडले

ठाणेवैभव करंडक स्पर्धा

ठाणे: ठाणेवैभव करंडक स्पर्धेच्या आज सेंट्रल मैदानावर झालेल्या ‘क’ गटातील प्रथम फेरीत सिएटच्या १११ धावांचा पाठलाग करताना मटेरीयल ऑर्गनायझेशनचा संघ ९० धावांत गडगडला.

मटेरीयल ऑर्गनायझेनच्या लक्ष्मीकांत माजलीकरने १८ धावांत चार तर सिएटच्या प्रकाश पाटीलने २४ धावात पाच विकेट्स घेऊन आपल्या भेदक गोलंदाजीची चुणूक दाखविली.

सिएट संघाने १९. १ षटकात १११ धावा उभारल्या. यात अक्षय जाधवच्या ३२ आणि विशाल जावळे यांच्या २१ धावांचे योगदान मिळाले. मटेरीयल ऑर्गनायझेशनच्या विवेक ठाकूर याने पाच षटकांत २५ धावा देत तीन बळी मिळवले मंगेश जाधव याने सहा षटकांत १७ धावा देत तीन बळी मिळवले. लक्ष्मीकांत माजलीकर याने ३.१ षटकांत १८ धावा देत चार बळी मिळवले. सिएट संघाच्या १११ धावांचा सामना करताना मटेरीयल ऑर्गनायझेशन संघ २१. १ षटकांत ९० धावाच उभ्या करू शकला. यात लक्ष्मीकांत माजलीकरच्या नाबाद १५ धावांचे योगदान होते. सिएटच्या प्रकाश पाटील याने सात षटकांत २४ धावा देत पाच बळी तर उत्कर्ष हजारे याने सात षटकांत १३ धावा देत दोन बळी घेतले.