अमेझॉन ओरिजनल मूव्ही सरदार उधमचे बहुप्रतिक्षित ट्रेलर!

भारतीय इतिहासातल्या एका अभूतपूर्व हुतात्म्याला सरदार उधम सिंगला दिलेल्या विशेष मानवंदनेच्या स्वरुपात आज ॲमेझॉन प्राईम व्हिडिओने आपला बहुप्रतिक्षित अमेझॉन ओरिजनल चित्रपट ‘सरदार उधम’च्या ट्रेलरचे आयोजन मुंबईतील पत्रकार परिषदेत. रॉनी लाहिरी आणि शील कुमार यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन शुजित सरकार यांनी केले असून विकी कौशलने सरदार उधम सिंग यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये शॉन स्कॉट, स्टिफेन हॉगन, बानिता संधू आणि क्रिस्टी ऍव्हर्टन यांच्या महत्वापूर्ण भूमिका असून अमोल पराशर एका विशेष भूमिकेमध्ये असणार आहे. भारत तसेच 240 देश प्रदेशातले प्राईम सभासद जगभरामधून येत्या दस-याला, 16 ऑक्टोबरला सरदार उधम पाहू शकतील.

त्यांनी गोळ्यांच्या 1850 फैरी झाडल्या. त्याने मात्र 6 गोळ्या झाडल्या. पण त्या 6 गोळ्यांचा स्वतंत्र सेनानींच्या मनावर आणि पुढच्या पिढ्यांवर सखोल प्रभाव पडला. ट्रेलरमध्ये सरदार उधम सिंगच्या जीवनाची झलक पहायला मिळते. विकी कौशल यात आधी कधीही न दिसलेल्या नव्या अवतारात दिसला आहे. या कधीही न सांगितल्या गेलेल्या गाथेमध्ये अज्ञात राहिलेल्या एका नायकाचे आपल्या इतिहासामध्ये खोलवर दडून राहिलेले अजरामर शौर्य, धैर्य आणि निर्भीडपणाची अनुभूती येते. 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये निघृणपणे मारल्या गेलेल्या प्रियजनांच्या मृत्यूचा सूड घेणा-या सरदार उधम सिंग यांच्या निश्चल धेय्यावर हा चित्रपट आधारित आहे.

“सरदार उधम सिंहच्या कथेने मी मंत्रमुग्ध आणि प्रेरित झालो जी दृढता, वेदना महत्वाकांक्षा, अभूतपूर्व धाडस आणि बलिदानाचे प्रतिनिधीत्व करते. यापैकी ब-याच पैलूंना मी चित्रपटातली माझी भूमिका साकारताना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. उधम सिंग साकारताना आणि अभूतपूर्व वीरता व दृढता असलेल्या व्यक्तीच्या गाथेत प्राण फुंकताना बरीच शारीरिक आणि खरे सांगायचे तर त्याहून जास्त मानसिक तयारी करावी लागली.” असे सरदार उधमची मध्यवर्ती भूमिका साकारणा-या विकी कौशलने सांगितले.

“मला या चित्रपटाच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात गूढ असे पान सर्वांसमोर आणण्याची संधी मिळाली. या गोष्टीला भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात सांगणे गरजेचे आहे आणि मला आनंद आहे की अमेझॉन प्राईम व्हिडिओसोबत सरदार उधम सर्व भौगोलिक सीमा पार करत आपल्या इतिहासाला जगभरात घेऊन जाणार आहे”, असे ते म्हणाले.

सरदार उधम माझ्यासाठी केवळ एक चित्रपट नसून ते एक साकार झालेले स्वप्न आहे. भारतातल्या सर्वात अमानुष शोकांकिकेचा सूड घेण्यासाठी आपल्या आयुष्याचे बलिदान देणा-या या हुतात्म्याच्या आजवर मूक असलेल्या कथेला जगासमोर आणण्यासाठी अतिशय सखोल संशोधन करावे लागले.” असे चित्रपटाचे दिग्दर्शक शुजित सरकार त्यांच्या सरदार उधमचे दिग्दर्शन करण्याच्या अनुभवाचे कथन करताना म्हणाले.

“उधम सिंगच्या देशप्रेमाचे आणि वीरतेचे सत्व आजही पंजाबच्या प्रत्येक व्यक्तींच्या हृदयात वसलेले आहे. उधम सिंगची कहाणी प्रेक्षकांसमोर आणून त्यांना प्रेरणा देणे हा हा चित्रपट बनवण्यामागचा माझा उद्देश होता. हा चित्रपट म्हणजे त्याच्या विशालकाय उत्साहाला, निर्भीडतेला तसेच देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात दिलेल्या बलिदानाला मी दिलेली मानवंदना आहे. संपूर्ण टीमला भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये महत्वपूर्ण भूमिका पार पाडणा-या या महान क्रांतीकारी वीराच्या कथेला सर्वांसमोर आणण्याची संधी मिळाल्याचा अतिशय अभिमान वाटत आहे.” असे सरकार पुढे म्हणाले.