पिसे बंधाऱ्याची पातळी घटली; ठाणेकरांवर पुन्हा पाणीबाणी ?

ठाणे : भातसा धरणातून ठाण्याला पुरवठा होणाऱ्या पाण्याचा विसर्ग दोन दिवस रोडावला असताना पिसे बंधाऱ्यापर्यंत येताना अति उन्हामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे झालेले बाष्पीभवन यामुळे पिसे बंधाऱ्यात पाण्याची पातळी घटली आह, े त्यामुळे ठाणेकरांना पुन्हा एकदा पाणीटंचाईचे संकट भेडसावणार आह.े

भातसा धरणातून ठाणे महापालिका २२०, स्टेममधून ११५ तर एमआयडीसीतून १२० एमएलडी पाणी घेते. भातसा धरणातून मिळणार पाण े ी पडघ्याजवळील पिसे बंधाऱ्यात साठवून पुढे टेमघरला शुद्धीकरण करून ठाणे शहर, वागळे, घोडबंदर आदी भागातील रहिवाशांची तहान भागवली जाते. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून हा पाणी पुरवठा कमी झाला आह. २९ फ े ेब्रुवारीला भातसा धरणाच्या दरवाजामध्ये बिघाड झाल्यामुळे पाणीपुरवठा ५० टक्क्यांवर आला. त्यामुळे ११ मार्चपर्यंत ठाणेकरांना निम्म्या पाण्यावर समाधान मानावे लागले. हा पाणीपुरवठा सुरळीत होऊन २५ दिवस उलटत नाहीत तोच भातसा धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग रोडावला.

भातसा धरण ते ठाणे पालिकेच्या पिसे बंधाऱ्यापर्यंतचे अंतर ५० किमी आहे. हा मार्ग पार करताना सध्याच्या वाढत्या तापमानामुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. पिसे बंधाऱ्याच्या पाण्याच्या पातळीत घट झाली आहे.

पिसे बंधाऱ्याची पातळी कमी होताच भातसा धरणाच्या संबंधित यंत्रणेशी ठाणे महापालिके ने संपर्क साधला. त्यांनीही पिसे बंधाऱ्याची पाहणी के ल्यानंतर विसर्ग वाढवण्यास सुरुवात के ली आहे. मात्र ५० किमीचे अं तर गाठून पाण्याची पातळी गाठण्यास आणखी १५ ते २० तास लागण्याची शक्यता असल्याची माहिती ठाणे महापालिके चे पाणी पुरवठा विभागाचे अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे यांनी दिली. लवकरच पाणी पुरवठा सुरळीत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त के ला आहे.