पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उदघाटन
ठाणे : दळणवळणासाठी अतिशय महत्वाचा ठरलेला समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते ठाण्यातील आमने हा शेवटचा टप्पा १ मे रोजी सुरु होण्याची शक्यता आहे. या शेवटच्या टप्प्याचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा राज्य सरकारचा मानस असून त्या दृष्टीने सरकारी पातळीवर हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत.
डिसेंबर २०२२ मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले. त्यानंतर मे २०२३ मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डी ते भारविर (नाशिक) टप्पा सुरू केला. त्याचवर्षी भारविर ते इगतपुरी (25 किमी) हा टप्पाही खुला करण्यात आला. समृद्धी महामार्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ ते २०१९ दरम्यान हाती घेतलेला महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. या महामार्गाचे काम २०१९ मध्ये सुरू करण्यात आले. मात्र कोरोनामुळे समृद्धी महामार्गाच्या कामाला काही काळ विलंब झाला. कोरोनानंतर मात्र या कामाला गती मिळाली. डिसेंबर २०२२ मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झाले. त्यानंतर मे 2023 मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डी ते भारविर (नाशिक) टप्पा सुरू केला. त्याचवर्षी भारविर ते इगतपुरी (25 किमी) हा टप्पाही खुला करण्यात आला.
एमएसआरडीसीने ५५ हजार कोटी खर्च करून ७०१ किमीचा २४ जिल्ह्यांना जोडणारा हा समृद्धी महामार्ग तयार केला आहे. त्यामुळे राज्याची दळणवळण व्यवस्थाही गतिमान झाली आहे. आतापर्यंत टप्याटप्प्याने या महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले आहे.
आता इगतपुरी ते आमने (ठाणे ) हा शेवटचा टप्पा येत्या १ मे रोजी खुला होण्याची शक्यता आहे. याचा सर्वाधिक फायदा हा नाशिकला होणार असून नाशिक ते मुंबई हे अंतर अवघ्या अडीज तासांत गाठता येणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये होणाऱ्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अॅण्ड एंटरटेन्मेंट समिटला उपस्थित राहणार असल्यामुळे, त्यांच्या हस्ते १ मे रोजी या प्रकल्पांचे लोकार्पण करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. हा महामार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर आणि ठाणे या १० जिल्ह्यांमधून जाणार आहे. महामार्गावर सुमारे ५० उड्डाणपूल, पाच बोगदे, ३०० वाहनांसाठी अंडरपास आणि ४०० पादचारी अंडरपास असतील.