ठाणे : घोडबंदर मार्गावरील एका हॉटेलच्या लिफ्टमध्ये सुमारे एक तास ग्राहक अडकून पडल्याची घटना आज शुक्रवारी घडली. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याने कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही.
चेना ब्रिज येथे असलेल्या सि रॉक या होटेलमधील ही लिफ्ट दुपारी ३.३०च्या दरम्यान अचानक बंद पडली होती. त्यामध्ये सहा ग्राहक होते. हॉटेलच्या व्यवस्थापन विभागाने लिफ्टची दुरुस्ती करणाऱ्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना पाचारण केले होते. त्यांनी लिफ्टचे दरवाजे उघडून सर्व ग्राहकांना सुखरूप बाहेर काढले.