खेकडे करू लागले भातरोपे फस्त; शेतकरी चिंताग्रस्त

* जिल्ह्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण
* अनियमित पावसामुळे लागवड लांबणार

ठाणे : जिल्ह्यात 70 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरीही यंदा अनियमित पावसामुळे लागवड लांबली आहे. तर दुसरीकडे खेकडे भात रोपांच्या हिरव्या काडीला कुरतडू लागल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

यंदाच्या वर्षी शेतक-यांनी भाताची जास्त लागवड केली. पण भातरोपांची हिरवी काडी रात्रीच्यावेळी खेकडे कुरतडत आहेत, अशी तक्रार शेतक-यांची आहे. या लागवडीनंतर खेकडा व अन्य जीवांचा भाताच्या रोपांना उपद्रव होऊ नये, कीटकनाशकांचा वापर करावा आणि खेकड्यांचे शेतांमधील प्रमाण कमी होते, अशी माहिती ठाणे जिल्हा कृषी अधिका-यांनी सांगितले तर काही शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात वीजेरीच्या मदतीने खेकड्यांना पळवून लावण्याचा प्रयत्न करतात, असेही सांगण्यात आले.

यावर्षी नागली आणि वरीसाठी प्रक्रिया उद्योगाला चालना मिळाली असून, खरीप हंगामाकरीता 12 हजार क्विंटल बियाणांची मागणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात यंदा सुमारे 3842 हेक्टर क्षेत्रावर संकरित बियाण्यांचा वापर होत आहे तर 56 हजार एकर क्षेत्रावर भात काढण्याचे लक्ष्य असून, 2700 किलो प्रती हेक्टर उत्पादनाचे लक्ष्य आहे. यंदा भात उत्पादकतेत 23 टक्के वाढ झाली असल्याची माहिती ठाण्याच्या कृषी अधिका-यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात पावसाचे येणे-जाणे सुरू आहे. अजूनही पाऊस सातत्याने पडत नसल्यामुळे बळीराजाला यंदा भाताची लागवड आणखी काही दिवस लांबणार आहे का अशी चिंता वाटू लागली. वाडा, विक्रम़ग़ड, मोखाडा, जव्हार येथील बळीराजांनीही याला दुजोरा दिला.

गेल्या वर्षी जून अखेर 260 मिमी पाऊस पडला होता. यावेळी फक्त तीनशे मिमी पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षीच्या जूनवेळी पाहत 380 पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली होती. हा जोर यावर्षीही सातत्याने राहिल्यास कामे पूर्ण होतील, असा होरा शेतक-यांना आहे.

यंदा जिल्ह्यात भातासह नागली, वरी यासोबत भेंडी, सोनचाफा, हळद या पिकांचेही क्षेत्र वाढवण्याचे नियोजन समोर ठेवले आहे.

जिल्ह्यातील शेतक-यांनी सरासरी उत्पन्न वाढवण्यासाठी, पीक किती काढावं याचा आराखडा तयार केला आहे. यावर्षी एमजी नरेगाच्या अंतर्गत मोगरा, सोनचाफा, जांभूळ आणि फणस यांची लागवड करण्याचे नियोजन आहे.