अर्धा डझन खिडकी तिकिटांसह 72 ई-तिकीटे जप्त
कल्याण : आरपीएफची सीआयबी टीम आणि कल्याण आरपीएफने तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्या एका दलालाला टिटवाळा येथून अटक केली आहे.
अरविंद तिवारी असे अटक करण्यात आलेल्या दलालाचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील रहिवासी आहे. सीआयबी कल्याण शाखेचे प्रभारी सुनील कुमार शर्मा यांनी सांगितले की, तिकिटांचा काळाबाजार होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. याच माहितीच्या आधारे सोमवारी सीआयबीचे उपनिरीक्षक जीएस अडले, एएसआय विजय पाटील, हेड कॉन्स्टेबल विनोद राठोड, जितेंद्र सिंग आणि कल्याण आरपीएफचे रितेश त्रिपाठी यांच्या पथकाने त्याचा कल्याण येथून पाठलाग करून टिटवाळा येथे अटक केली.
झडतीदरम्यान, सहा काउंटर तिकिटे आणि सात चालू तिकिटे याशिवाय दलालाकडून एकूण 72 तिकिटे जप्त करण्यात आली. सीआयबीचे प्रभारी सुनील कुमार शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दलाल अरविंदकडून 2 दोन लाख 6,866 रुपयांची तिकिटे जप्त करण्यात आली आहेत. तसेच पंचनामा केल्यानंतर पुढील तपासासाठी कल्याण आरपीएफ पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.