सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा ठाण्यात आरोप
ठाणे : बिल्डर ज्या इमारतीला हात लावतील ती इमारत ठाणे महानगरपालिकेतील अधिकारी धोकादायक ठरवतात आणि त्या इमारतीमधील नागरिकांना वाऱ्यावर सोडतात. अशा रहिवाशांकरिता लढत राहणार असा निर्धार सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.
पूर्व ठाण्यातील सिंधी कॉलनी येथिल बिल्डिंग न १५ आणि १६मधील रहिवाशांच्या शिष्टमंडळाने श्रीमती दमानिया यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी महापालिका अधिकारी-कर्मचारी यांच्या कामाबद्दल संशय व्यक्त केला.
बिल्डिंग न १६मधील नागरिकांना बिल्डरने रस्त्यावर आणले आहे. गेले तीन महिने त्यांना भाडे देखिल दिले नाही. धोकादायक इमारतीच्या नावाखाली अधिकारी पुढाऱ्यांच्या सांगण्यावरून बिल्डर मंडळीना मदत करत असल्याचा आरोप श्रीमती दमानिया यांनी केला. पूर्व भागातील बिल्डिंग न १६मधील नागरिकांचे पुनर्वसन करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त श्री. राव यांनी दिले आहेत. ४८ तास वाट पाहून त्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल. अति धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या न्याय-हक्कासाठी लढत राहणार असल्याचे श्रीमती दमानिया यांनी सांगितले.