कल्याण : नुकतीच ९वी वरिष्ठ लगोरी राज्यस्तरीय स्पर्धा नंदुरबार येथील के. आर स्कुल चौपाळे येथे दिनांक ९ व १० एप्रिल २०२२ रोजी पार पडली. या स्पर्धेत पालघर जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावून आपला दबदबा कायम ठेवला. अंतिम सामना हा पालघर व वाशीम संघामध्ये खेळण्यात आला. तीन सेट च्या ह्या सामन्यात पालघर जिल्ह्याने वाशीम ला टक्कर देत अखेर सामना जिंकला.
या स्पर्धेत प्रथम पालघर जिल्हा, द्वितीय वाशीम जिल्हा, तृतीय नंदुरबार जिल्हा व चतुर्थ औरंगाबाद जिल्हा यांनी अनुक्रमे पटकवली. पालघर जिल्ह्यातील संघात खेळत असलेले खेळाडू ह्यूमन सर्वर मल्टिपरपोज ऑर्गनायझेशन चे संस्थापक स्वप्नील शिरसाठ व सिद्धांत जाधव, करण गौड, रितीक चौधरी, विशाल निषाद, सूरज काळे, अक्षय धुळे, रोहित आहिरे, बरकत शेख, आशुतोष पांडे, धम्मसुर्या आरवेल हे होते. लगोरी पालघर जिल्हाचे मुग्धा लेले यांनी मुलांचे कौतुक केले. तसेच प्रशिक्षक रुपाली वाघुंडे यांनी मुलांना सदिच्छा देत उत्साह वाढवला.
ह्यूमन सर्वर मल्टिपरपोज ऑर्गनायझेशन ग्रामीण व शहरी भागातील मुलांच्या खेळ तसेच शिक्षण या विषयावर काम करत आहे व खेळाच्या माध्यमातून मुलांना शिक्षणाकडे वळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. ९ वी वरिष्ठ लगोरी स्पर्धेत मुलांना हे मिळालेलं यश नक्कीच त्यांना प्रेरणा देईल असा विश्वास संस्थेच्या सेक्रेटरी रुपाली वाघुंडे यांनी व्यक्त केला.