कल्याण : बदलापुरात महिला पत्रकाराला अपशब्द वापरल्या प्रकरणी वामन म्हात्रे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. वामन म्हात्रे यांचा अटकपूर्व जमीन अर्ज कल्याण सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.
बदलापूरमधील शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी बदलापुरातील अल्पवयीन मुलींच्या अत्याचार प्रकरणी हिंसाचार झाल्यानंतर महिला पत्रकारासोबत अर्वाच्य भाषेचा वापर केल्याचा आरोप महिला पत्रकाराने केला होता.
या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात विनयभंगआणि ॲट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी कल्याण सत्र न्यायालयात अटकपूर्व जमीन अर्ज सादर केला होता. मात्र गुरुवारी कल्याण सत्र न्यायालयाने हा अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी वामन म्हात्रे यांना अटक होऊ शकते. जामीन अर्ज फेटाळल्याची माहिती महिला पत्रकाराचे वकील भूषण बेंद्रे यांनी दिली.