सीबीएससी दहावीत ठाण्याचा यश भसीन देशात प्रथम

ठाणे: ठाण्यातील श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया शाळेतील यश भसीन याने सीबीएससी दहावीच्या परीक्षेत ९९.८० टक्के आणि एआयआर १ रँक मिळवत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

आपल्या यशाबद्दल यश भसीन म्हणतो, खरंतर परीक्षेआधी मी खूप अस्वस्थ आणि चिंताग्रस्त होतो. पण माझ्या वडिलांनी मला योग्य मागर्दर्शन करून पाठिंबा दिला. ते नेहमीच मला शांत डोक्याने विचार करायला सांगतात आणि त्याचाच मला फायदा झाला. ९७ टक्के गुण मिळतील अशी मी अपेक्षा केली होती, मात्र त्याहीपेक्षा जास्त गुण मला मिळाले, त्यामुळे मी खूप खुश आहे, असे यश म्हणाला.

पुढे जाऊन मी आयआयटी मुंबईमधून कॉम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा एरोस्पेस इंजिनिअरिंग करणार आहे. आणि त्यादृष्टीने मी तयारीही सुरु केली आहे.