आगळ्या-वेगळ्या स्कूल बॅग ठाणेकरांना लागल्या खुणावू!

शैक्षणिक वर्षाची सुरुवात आता काही शाळांमध्ये झाली असून काही शाळा थोड्याच दिवसांनी सुरू होणार आहेत आणि त्यासाठी मुलांची व पालकांची खरेदीची लगबग चालू झाली आहे. त्यासाठी सर्वात आधी खरेदी केली जाणारी आणि आवश्यक असणारी वस्तू म्हणजे स्कूल बॅग. स्कूल बॅग्स खरेदी करणे हा मुलांचा आवडीचा व लाडका विषय आहे. शाळेची बॅग किंवा स्कूल बॅग हा प्रत्येक मुलाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. याबरोबरच हल्ली नोकरीनिमित्त प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गाला ऑफिससाठी बॅग आवश्यक आहे. हॅण्ड बॅग, स्कूल बॅग, ऑफिस बॅग कुठे मिळतात याबाबत माहिती घेऊया.

फाल्गुनी नॉव्हेल्टी

फाल्गुनी नॉवेल्टीमध्ये सर्व प्रकारच्या बॅग्स उपलब्ध आहेत. यात लेडीज पर्स, लेदर, बॅगपॅक आणि पार्टी वेअर क्लच इ. अनेक प्रकारांचा समावेश आहे. तसेच लहान मुलांच्या आवडीच्या कार्टून बॅग्ससुद्धा येथे उपलब्ध आहेत. सध्या ट्रेडिंगमध्ये असणाऱ्या क्विक फॅशन टोट बॅग आणि ब्रँडेड ऑफिस पर्स आणि काही स्लिंग बॅग सुध्दा येथे उपलब्ध आहेत. येथे मिळणाऱ्या बॅग्सची किंमत ३०० रूपयांपासुन सुरु होते. स्त्रियांसोबतच पुरुषांना लागणाऱ्या बॅग्स येथे उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठीच्या बॅग पॅक आणि कार्टून बॅग्स येथे उपलब्ध आहेत. मुलांना ब्लॅक आणि ब्राउन कलर्सच्या बॅग्स आणि या कलर्सचे कॉम्बिनेशन खूप आवडतात म्हणून त्या प्रकारच्या बॅग्स येथे उपलब्ध आहेत. लहान मुलींसाठी कार्टून बॅग्स बॅकपॅक देखील उपलब्ध आहेत. येथे सर्व वयोगटाच्या फॅशन प्रमाणे बॅग्सची खरेदी करता येते. विशेष म्हणजे मेक इन इंडिया मोहिमेचा प्रचार करण्यासाठी येथील बहुतेक बॅग सर्वोच्च गुणवत्तेसह स्वदेशी ब्रँडसह भारतात बनवल्या जातात. या बॅग्स तयार करण्यासाठी नापा लेदर, प्युअर लेदर वापरले जाते आणि ऑल सिझनसाठी कोरियन लेदर वापरले जाते.

पत्ता : -फाल्गुनी नॉव्हेल्टी, कृष्णा निवास, गोखले रोड, ठाणे पश्चिम

संपर्क : 98212 66888
————-
फॅन्सी बॅग्स

ठाण्यातील जांभळी नाका येथे असलेल्या फॅन्सी बॅग्स मध्ये सर्व प्रकारच्या बॅग्स उपलब्ध आहेत. ऑफिस बॅग्स, ट्रॅव्हल बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज बॅग्स इ. बॅग्स येथे उपलब्ध आहेत. येथे उपलब्ध असलेल्या बॅग्सची किंमत १५० रुपयांपासून सुरु आहे. लहान मुलींसाठी स्कूल बॅग्समध्ये बार्बी डॉल बॅग्स आणि ४ ते ५ चैन असलेल्या बॅग्स उपलब्ध आहेत. मुलींना पिंक आणि स्काय ब्लू कलरच्या बॅग्स खूप जास्त आवडतात त्यामुळे त्या कलरवर कॉम्बिनेशनच्या बॅग्स देखील येथे उपलब्ध आहेत. मुलांसाठी कार्टून बॅग्समध्ये बेन टेन, स्पायडर मॅन, मिक्की माउस बॅग्स येथे उपलब्ध आहेत सोबतच प्लेन बॅग्स देखील येथे उपलब्ध आहेत. मोठ्या मुलांसाठी जिम बॅग, ट्रॅकिंग बॅग, वेस्ट पाउच येथे मिळतात. स्कूल बॅग्समध्ये येथे वेगवेगळे ब्रँड उपलब्ध आहेत. जसे सफारी, FB इ. या दुकानात सर्व वयोगटातील लोकांकरिता बॅग्स उपलब्ध आहेत. कॉलेजच्या मुलांसाठी जीन्स फायबर मध्ये बॅग्स उपलब्ध आहेत.

पत्ता : जांभळी नका, शॉप नं. ४ ARK७ टॉवर, ठाणे

संपर्क :  70213 82224
—————

वेला मोडा

राम मारुती रोड येथे असलेल्या वेला मोडा – ‘लवकर ये, उशिरा ये पण नक्की ये’ या बॅग्सच्या शॉपमध्ये सर्व प्रकारच्या बॅग्स उपलब्ध आहेत. येथे स्कूल बॅग्स, स्लिंग बॅग, ऑफिस बॅग्स, लॅपटॉप बॅग्स, जीन्स बॅग्स इ. सर्व प्रकारच्या बॅग्स उपलब्ध आहेत. येथे ५०० रुपयांपासून बॅगच्या किमती आहेत. लहान मुलींसाठी स्कूल बॅग्समध्ये कार्टून बॅग्स, बार्बी डॉल बॅग्स, डोरेमॉन बॅग्स, शिमर बॅग्स उपलब्ध आहेत तर ४ ते ५ चैन असलेल्या बॅग्स उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्सच्या बॅग्स उपलब्ध आहेत. मुलांसाठी कार्टून बॅग्स उपलब्ध आहेत, वेगेवेगळ्या कॅरॅक्टरच्या बॅग्स आणि प्लेन बॅग्स देखील येथे उपलब्ध आहेत. स्कूल बॅग्समध्ये येथे वेगवेगळे ब्रँड उपलब्ध आहेत. या दुकानात सर्व वयोगटातील नागरिकांकरिता बॅग्स उपलब्ध आहेत. येथील फ्लोरल प्रिंटच्या बॅग्स आणि प्रिंटेड बॅग्स ग्राहकांचे लक्ष वेधून घेतात. लेदर, आर्टिफिशियल लेदर आणि इंपोर्टेड फॅब्रिक्स बॅग्सच्या भरपूर व्हरायटी येथे पाहायला मिळतात.

पत्ता : शॉप नं ४, राम मारुती रोड, नौपाडा, ठाणे

संपर्क : 99209 23395