पॉप्युलर चायनीज रेस्टॉरंट्सची ठाणेकरांना भुरळ

आपल्याकडे मिळणारे चायनीज पदार्थ हे १९ व्या शतकात आले. चीनच्या हक्का भागातून चिनी लोकांचा एक समूह कोलकतात स्थायिक झाला होता. त्यांच्यासोबत चायनीज पदार्थ आपल्याकडे आले.

सध्या चायनीज पदार्थाची चटक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच लागली आहे. तरुणांचा चायनीज फूड हा एक वीकपॉईंट झालेला आहे. बाहेर जेवायला जायचे म्हटले की बरेच जण चायनीज खाण्याचाच बेत करतात. चीनमध्ये मिळणारे चायनिज पदार्थ व भारतात मिळणारे चायनिज पदार्थ यात फरक आहे. आजकाल प्रत्येक ठिकाणी चायनीज फूड मिळते. भारतात तयार होणारे चायनीज फूड हे खूप मसालेदार असते.

1. ऑथेंटिक स्पाईस 

ऑथेंटिक स्पाईस हे ठाण्यातील २० वर्ष जूने असलेले चायनीज रेस्टॉरंट आहे. येथे चायनीज सूप, स्टार्टर्स, भात/नूडल्स ग्रेव्ही असे अनेक चायनीज पदार्थ उपलब्ध आहेत. येथे व्हेज चायनीज पदार्थांमध्ये पनीर किंवा भाज्यांच्या बेसमधील सूपचे प्रकार, स्टार्टर्स, भात आणि नूडल्स उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे नॉन व्हेज चायनीज पदार्थांमध्ये चिकन किंवा कोळंबीच्या बेसमधील सर्व प्रकार मिळतात. तेथील मेनू बऱ्याच वर्षांपासून ग्राहकांच्या पसंतीचाच आहे, येथे भारतीय आणि चायनीज मसाल्यांचे मिश्रण आहे जे त्या डिशला इतर रेस्टॉरंट्सपेक्षा वेगळी चव देते. येथे येणारे ग्राहक मुख्यतः लॉली पॉप, मंचाओ सूप, चिल्ली, क्रिस्पी, ट्रिपल राईस इ. प्राधान्य देतात. येथे मिळणारे चिकन लांबा, चायनीज शैलीची बिर्याणी इत्यादी भारतीय पदार्थ चीनी शैलीमध्ये तयार केले जातात. येथील चायनीज डिशेस तयार करताना अजिनोमोटोचा वापर नाही केला जात त्यावर पर्यायी वापरला जातो, जो अजिनोमोटोच्या तुलनेत आरोग्यदायी आहे. या रेस्टॉरंटचे आचारी नेपाळचे असून चीनी पाककृतीमध्ये विशेष आहेत.

पत्ता : वर्तक नगर, झेडपी मैदानाच्या मागे, ठाणे
संपर्क : ७२०८४९२८७३

2. हाँगकाँग (Hong Kong) चायनिज फूड अँड रेस्टॉरंट

हाँगकाँग चायनीज फूड अँड रेस्टॉरंट हे ठाण्यातील 2018 पासुन सुरु असलेले चायनीज रेस्टॉरंट आहे. येथे चायनीज सूप, फ्राईड राइस, शेजवान राईस, शेजवान स्टार्टर्स, पनीर राईस, शेजवान ट्रिपल राईस असे खाद्य पदार्थ उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त कोळंबी दिशेस ही मिळतात. येथे व्हेजमध्ये व्हेज क्रिस्पी सुद्धा ट्राय करू शकता, पनीर चिली ड्राय ही सुद्धा चवदार मिळते. नॉनव्हेज चायनीज स्टार्टर्समध्ये येथे चिकन क्रिस्पीसोबत अनेक नॉन व्हेज चायनीज पदार्थ मिळतात. तेथील नवीन डिशेसमध्ये चिकन ड्रम राईस, ड्रम नूडल्स, अंडा पॅकिंग राइसचा समावेश आहे. येथे आजिनोमोटो खूप कमी प्रमाणात वापरला जातो. काही डिशमध्ये सोया सॉस किंवा ऍरोमॅटिक हा पर्यायी टेस्टसाठी वापरला जातो. ट्रिपल शेजवान राईस / नूडल्स, चिकन क्रिस्पी, लॉलीपोप, चिकन कोळीवाडा इ. अनेक चायनिज डिशेसचा आस्वाद घेण्यासाठी ठाणेकर इकडे नेहमीच गर्दी करताना दिसतात.

पत्ता : लक्ष्मी पार्क, ठाकूर बंगलो जवळ, ठाणे
संपर्क : ९१६७३७९३५५

3. चेनग्स (Cheng’s) चायनीज किचन 

चेनग्स (Cheng’s) चायनीज किचन हे रेस्टोरेंट ठाण्यात जानेवारी २०२२ मध्ये सुरु झाले. येथे चायनीज फूडमध्ये सूप, स्टार्टर्स, ग्रेव्ही, राईस / नूडल्स कॉम्बिनेशन हे व्हेज आणि नॉन व्हेज दोन्हीमध्ये उपलब्ध आहेत. चेनग्स (Cheng’s) चायनीज किचन येथे मोमोस देखील उपलब्ध आहेत. नवीन पदार्थात त्यांनी स्टार्टर्स ऍड केले आहेत. बेबी कॉर्न मशरूम याचा समावेश केला आहे. येथील व्हेज आणि नॉन व्हेज मोमोस हे खूप प्रसिद्ध आहेत. चेनग्स (Cheng’s) चायनीज किचन येथे पनीर स्टाटर्स, पॅन फ्राय नूडलस या सर्वांना मागणी आहे. येथे सर्व पदार्थात अजिनोमोटोच्या जागी एरोमेटिक पाउडरचा वापर केला जातो. चायनीज बनवण्यासाठी येथे चायनीज आचारी आहेत. येथे 20-25% मेनूला भारतीय स्पर्श आहे, कारण भारतीयांना भारतीय चायनीज आणि मुंबईतील काही लोकप्रिय पदार्थ आवडतात. ठाणे म्हणजे Sixhuan कॉम्बिनेशन राईस सारखे ठाण्यातील ट्रिपल शेजवान राईस, चिकन लॉलीपॉप, ऍपल चिकन, सिंगापूर राईस आणि चिकन 65 याचा समावेश होतो.

पत्ता : साईनाथ नगर, माजिवडा, ठाणे

संपर्क : ८७७९८ ५१६९९