ठाणे: ठाण्यातील मृदुल रामास्वामी याने जेईई मेन (सत्र 1-जानेवारी 2025) मध्ये 99.8414 पर्सेंटाइल मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ‘नायक्स ट्युटोरियल्स’ या प्रतिष्ठित कोचिंग संस्थेचा तो पाच वर्षांपासून विद्यार्थी असून, त्याच्या मेहनतीला आणि संस्थेच्या मार्गदर्शनाला यशाचा बहुमान मिळाला आहे.
जेईई मेन ही भारतातील अभियांत्रिकी प्रवेशासाठीची अत्यंत कठीण समजली जाणारी परीक्षा आहे. यात मिळवलेली उच्च पर्सेंटाइल मृदुलच्या कठोर परिश्रमाचे आणि अभ्यासातील सातत्याचे प्रतिबिंब आहे.
‘नायक्स ट्युटोरियल्स’ने त्यांच्या अधिकृत जाहिरातीत मृदुलच्या या यशाचे कौतुक करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ठाण्यातील हा विद्यार्थी भविष्यात आयआयटी किंवा अन्य नामांकित अभियांत्रिकी संस्थेत प्रवेश घेऊन मोठे यश मिळवेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.