ठाण्याला मिळणार परदेशी बॅडमिंटन प्रशिक्षक

आंतर जिल्हा सिनिअर बॅडमिंटन स्पर्धेची सांगत

ठाणे : सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेसाठी परदेशी बॅडमिंटन प्रशिक्षक आणण्याची योजना श्रीकांत वाड यांनी केली होती. त्याला अनुकूल प्रतिसाद देत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी परदेशी प्रशिक्षकाचा सर्व खर्च स्वतः उचलण्याची घोषणा केली.

श्रीकांत वाड यांनी योग्य त्या प्रशिक्षकाचा शोध घेऊन त्याची लवकरात लवकर नेमणूक करावी असे देखील एकनाथ शिं दे यांनी सुचविले. ठाण्याच्या खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलचे नूतनीकरण करून त्याचे आणखी विस्तारित पाच कोर्टामध्ये रूपांतरण करण्याची घोषणा या प्रसंगी एकनाथ शिंदे यांनी के ली. आंतर जिल्हा सिनिअर बडॅमिंटन स्पर्धेच्या समारोप प्रसंगी रे बोलत होते. जिल्हा बडॅमिंटन असोसिएशनने के लेल्या मागणीनुसार आणि खासदार कु मार के तकर यांच्या सुचनेनुसार खंडू रांगणेकर बडॅमिंटन हॉलची नियोजित इमारत १० कोर्टाची होणार असून त्यामध्ये पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र हॉस्ल करण् टे यात येणार आहे. या कामाची तातडीने प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश एकनाथ शिं दे यांनी दिले. हे कोर्ट तयार झाल्यास ठाण्यातून ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू तयार होतील असे देखील एकनाथ शिंदे यांनी
आवर्जून सांगितले. पूर्ण हॉस्ल त टे यार झाल्यानंतर ठाण्याचा बॅडमिंटन हॉल अद्ययावत आणि आं तरराष्ट्रीय दर्जाचा होऊन इथे राष्ट्रीय प्रशिक्षण कें द्र सुरु होऊ शके ल असे महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अरुण लखानी यांनी सांगितले.

या समारंभाला सर्व खेळाडू तसेच पालक आणि सर्व प्रशिक्षक आणि पारिजात नातू यांच्या नेतृत्वाखालील सर्व पंच मंडळींनी उत्तम कामगिरी केली. या प्रसंगी सर्व सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक मिळवणाऱ्या संघांना दीड लाख रुपयांची रोख बक्षिसे देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन योजनाप्रमुख श्री श्रीकांत वाड यांनी के ले तर स्पर्धा सचिव मयूर घाटणेकर आणि ठाणे जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यानी एकनाथ शिंदे यांचा सत्कार के ला व त्यांना ठाणे जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचा ब्लेझर प्रदान के ला. ठाणे महापालिके चे आयुक्त डॉ. विपीन शर्मायांनी देखील नियोजित प्रस्तावित बॅडमिंटन विस्तारित इमारतीला सर्व प्रकारचे सहकार्य महापालिके तर्फे दिले जाईल असे घोषित के ले व परदेशी प्रशिक्षकासाठी जी काही मदत लागेल ती देखील महापालिके तर्फे करण्यात येईल असे आवर्जून नमूद केले.