ठाणे : ठाणे शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी अनधिकृतपणे सुरू असलेल्या हातभट्ट्या व गावठी दारू (Alcohol production) तयार करणाऱ्यांविरोधात ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने (Maharashtra state excise department) विशेष मोहीम हाती घेतली. या मोहिमेअंतर्गत ठिकठिकाणी छापे मारून ३२ गुन्हे दाखल करण्यात आले असून १९ जणांना अटक (nineteen culprit arrested) करण्यात आली आहे; तर गावठी व देशी मद्यासह मद्य बनविण्यासाठी लागणारे साहित्य असा ११ लाख ३७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त (Property seized) करण्यात आला असल्याची माहिती राज्य उत्पादन विभागाने दिली.
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, भिवंडी, उल्हासनगर आणि डोंबिवली आदी भागांत अवैध्यरित्या सुरू आलेल्या गावठी दारू निर्मिती केंद्र राजरोसपणे सुरू आहे. त्यामुळे विशेष मोहिमेचे आयोजन करीत ठिकठिकाणी टाकलेल्या धाडीत ३२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच १९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच या कारवाईदरम्यान, ४२ हजार ८५० लिटर रसायन, २०० किलो काळा गूळ, एक हजार किलो साखर, याचबरोबर ८३५ लिटर गावठी मद्य, तर ४३.१४ लिटर देशी मद्याचा साठा असा ११ लाख ३७ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती ठाणे राज्य उत्पादन विभागाने दिली.
जिल्ह्यात अवैध्यरीत्या सुरू असलेल्या हातभट्ट्यांबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. कुठलेही भेसळयुक्त, कमी किमतीचे मद्य खरेदी करू नये. त्यामुळे जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. शासन मान्य दुकानातूनच मद्य खरेदी करावे.
– नीलेश सांगडे, अधीक्षक, राज्य उत्पादन विभाग, ठाणे.