२१ पेक्षा जास्त गाड्या जाणार
ठाणे : होलिकोत्सवासाठी कोकणात जाण्यास तय्यार असलेल्या ठाणेकरांसाठी ठाणे एस.टी महामंडळाच्या २१ पेक्षा जास्त गाड्या सज्ज झाल्या आहेत. काही गाड्या कोकणांत पोहचल्या आहेत.
ठाण्याहून शिवशाही, सीएनजी, साधी या प्रकारच्या बसगाड्या सोडण्यात आल्या. या बसगाड्यांत प्रवाशांची आसनक्षमता ४२ इतकी आहे.
ठाणे-साखरपा आणि ठाणे- चिपळूणचा बसप्रकार शिवशाही वगळता काही सहा बसेस साधी प्रकारातील आहे.
ठाणे-महाड, ठाणे-खेड,ठाणे-दापोली, ठाणे-महाड,ठाणे-फौैजी आंबवडे या बसेस सीएनजी प्रकारातील आहेत. साधी बस ठाणे-शिंधी, ठाणे-गुहागर, भांडुप-माखजन, ठाणे-केळशी व्हाया मंडणगड, ठाणे-कळवा-रत्नागिरी, ठाणे-कळवा-चिपळूण, ठाणे-कळवा-रत्नागिरी, ठाणे- महाबळेश्वर टी २ आणि ठाणे-टी २ महाबळेश्वर या मार्गांवर सोडण्यात आल्या आहेत.
कल्याण, ठाणे २, भिवंडी, शहापूर या आगारांहून बसगाड्या सोडल्यामुळे कोकणवासी होलिकोत्सवासाठी रवाना झाले असून, आणखीन मुंबई, ठाणे, कल्याण आदी शहरांतील चाकरमानी कोकणात जाणार आहेत, अशी माहिती एस.टीच्या वरिष्ठ अधिका-यांनी ‘ठाणेवैभव’ला दिली.