‘क’ गटात ठाणे महानगरपालिका अजिंक्य

ठाणे: ठाणेवैभव करंडक आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धेच्या ‘क’ गटातील एकतर्फी अंतिम लढतीत आज ठाणे महानगरपालिका संघाने सेंचुरी रेयॉन संघाची १०३ धावसंख्या एक विकेट गमावून ओलांडत प्रतिष्ठेच्या ‘ठाणेवैभव’ करंडकावर आपले नाव कोरले.

विजयी संघातर्फे मध्यमगती डावखुरा गोलंदाज राकेश नाईकने सेंच्युरीचा निम्मा संघ २५ धावांत गुंडाळल्यावर डावखुरा आघाडीवीर जयदीप परदेशीने ५२ चेंडूत सात चौकारांसह अर्धशतक (नाबाद ५०) झळकावले. त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या अर्जुन शेट्टीने नाबाद ४३ धावांची खेळी करून साथ देत ठाणे पालिकेचा विजय साजरा केला.

समीर धिरवाणी-निनाद कुळकवळेकर या पंचांनी ठाणे पालिकेच्या संघाच्या राकेश नाईक याची सामनावीर म्हणून निवड केली.

संक्षिप्त धावफलक ‘क’ गट : अंतिम सामना

सेंचुरी रेयॉन २६.३ षटकात १०३ (संतोष माली २९, हर्षल सोनी ५-०-२८-२, निखिल बागल ४-१-१७-१, शशिकांत कदम ७-१-२१-१, जयेश पाटील २.३-०-१०-१, राकेश नाईक ७-२-२५-५) पराभूत वि. ठाणे महानगरपालिका १५.१ षटकात १ बाद १०७ (जयदीप परदेशी नाबाद ५०, अर्जुन शेट्टी नाबाद ४३, रोशन जाधव १.१-०-१६-१)

वैयक्तिक पारितोषिक विजेते –
सर्वोत्तम फलंदाज-राहुल कोंडावूर-नाबाद १४५. विहंग एन्टरप्रायझेस सर्वोत्तम गोलंदाज- अश्विन शेळके ४-१-८-५. युनायटेड पटनी सर्वोत्तम अष्टपैलू-प्रदीप पांडे (५३ धावा-७४ धावत ६ विकेट्स) सेंचुरी रेयॉन विशेष उल्लेखनीय कामगिरी- हर्षल सोनी ५.२-१-१२-५. ठाणे महानगरपालिका