ठाणे : ठाण्यात ठाकरे गटाने पाकिस्तानी झेंडा जाळून दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी शहीद झालेल्या हिंदू पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे संपर्कप्रमुख नरेश मणेरा, उपजिल्हाप्रमुख कृष्णकुमार कोळी, सुनील पाटील, महिला जिल्हाप्रमुख रेखा खोपकर, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, उपशहर प्रमुख सचिन चव्हाण, वसंत गव्हाळे, राजू शिरोडकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.