श्रुती मोरेला कांस्यपदक
ठाणे : ठाण्याचे तेजस लोखंडे आणि श्रुती मोरे यांना महाराष्ट्र ऑलिंपिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे.
पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे २ ते १२ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील खेळाडू तेजस लोखंडे आणि श्रुती मोरे यांनी चमकदार कामगिरी केली आहे. तेजस लोखंडे याने 89 किलो वजनी गटात 306 किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळविले तर श्रुती मोरे हिने 71 किलो वजन गटात 148 किलो वजन उचलून कांस्यपदक मिळविले. तेजस लोखंडेला काथोड भोईर यांचे मार्गदर्शन लाभले असून सध्या नॅशनल सेंटर ऑफ एक्सीलेंस औरंगाबाद येथे सराव करीत आहे.
श्रुती मोरे हिला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त मधुरा सिंहासने, दत्तात्रय टोळे यांचे मार्गदर्शन लाभले. ती सध्या अश्वमेध वेटलिफ्टींग फाऊंडेशनच्या वेटलिफ्टींग सेंटर ठाणे येथे सराव करते. तसेच खेळाडूंना वेटलिफ्टींग असोसिएशन ठाणेचे सहकार्य लाभले.