देशातील सर्वात मोठा शहरी बोगदा खणण्यासाठी टीबीएम पात्र

ठाणे: ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’च्या ठाणे आणि बोरिवली बोगदा (ट्विन टनेल) प्रकल्पासाठी वापरल्या जाणा-या पहिल्या ‘टनेल बोरिंग मशीन’ने (टीबीएम) स्वीकृती चाचणी उत्तीर्ण केली आहे. मुंबईतील पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये वापरला जाणारा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा ‘टीबीएम’ आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) अंतर्गत महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यासाठी ‘मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड’ (एमईआयएल) द्वारे वापरल्या जाणा-या चार ‘सिंगल-शील्ड हार्ड-रॉक टीबीएम’पैकी हे पहिले टीबीएम आहे.

‘एमईआयएल’ने टनेल बोरिंग मशीन बनवणारी ‘प्रसिद्ध जर्मन कंपनी हेरेनकनेट एजी’कडून या ‘टीबीएम’साठी ऑर्डर दिली आहे. 1400 ए हे तामिळनाडूच्या अलिंजिवक्कम येथील कारखान्यात जोडण्यात (असेंबल) आले आहे. तेथेच कारखाना स्वीकृती चाचण्यांमध्ये ते उत्तीर्ण झाले होते आणि तेच मशीन उघडून मुंबईत आणले जाणार आहे.

११.८४ किमी लांबीच्या ठाणे-बोरिवली ट्विन टनेल प्रकल्पाच्या बांधकामांसाठी तैनात करण्यात येणा-या चार ‘मेगा टीबीएम’पैकी पहिल्या ‘टीबीएम’ने तामिळनाडूतील अलिंजिवक्कम येथील हेरेनकनेटच्या उत्पादन सुविधेत फॅक्टरी स्वीकृती चाचण्या यशस्वीरित्या उत्तीर्ण केल्या आहेत.

बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या असलेल्या जुळ्या १०.८ किमी लांबीच्या रस्त्याच्या बोगद्यांचे खोदकाम करणार आहेत. हे काम खुपच क्लिष्ट आहे. बोरिवलीतील एकता नगरला आणि ठाण्यातील मानपाडा येथील टिकुजीनी-वाडीशी जोडण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुलैमध्ये मुंबई भेटीच्या दरम्यान ठाणे-बोरिवली जुळ्या बोगद्यांची पायाभरणी केली होती. या बोगद्यांमध्ये प्रत्येकी तीन लेन असणार आहेत. त्याची खोली पृष्ठभागाखाली जास्तीत जास्त २३ मीटर असणार आहे. दर ३०० मीटरवर क्रॉस-पॅसेज बांधले जाणार असल्यामुळे निर्वासन आणि देखभालीचे काम सुव्यवस्थित होणार आहे.

1400ए सह चारहीपैकी प्रत्येकी 13.2-मीटर व्यासाचे भव्य कटर हेडने सुसज्ज आहे. त्यामुळे ते मुंबईत आतापर्यंत तैनात केलेले सर्वात मोठे कटरहेड बनले आहे. हे मुंबई कोस्टल रोड प्रोजेक्टच्या वापरल्या जाणा-या 12.19-मीटर व्यासाच्या कटरहेडपेक्षा जास्त आहे. त्यामुळेच जुळे बोगदे यशस्वीरित्या बांधण्यात आले आहेत. प्राधिकरणने एका सुप्रसिद्ध जर्मन कंपनीकडून ऑर्डर दिली आहे.