पिंपल्स हे प्रामुख्याने हार्मोन्स आणि चेहऱ्याच्या त्वचेच्या आरोग्याशी संबंधित असलेला आजार आहे आणि त्यावर आयुर्वेदिक उपचार हे खूप प्रभावी दिसून आले आहेत. पिंपल्स चेहऱ्यावर येण्यासाठी खालील गोष्टी प्रामुख्याने कारणीभूत ठरतात.
१) रक्तदुष्टी – तेलकट, मसालेदार आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांमधून होणारी
२) शरीरातील टाकाऊ घटक शरीरातच साठणे
३) हार्मोनमध्ये असंतुलन
४) स्ट्रेस – टेन्शन
५) चेहऱ्याच्या त्वचेची योग्य काळजी न घेणे – सौंदर्य प्रसादनांचा अमाप वापर.
तुम्हाला जर पिंपल्सचा त्रास असेल तर खालील टिप्स नक्की तुम्हाला मदत करतील.
आहार (Diet)
गाजर, काकडी आणि हिरव्यागार भाज्या, व्हिटॅमिन C आणि अँटिऑक्सिडेन्ट भरपूर असलेली फळे घ्या.
ओमेगा ३ फॅट भरपूर असणाऱ्या सूर्यफूल, भोपळा, टरबूज यासारख्या बियांचा वापर करा.
मुबलक पाणी प्या. पुरेशी झोप घ्या.
हे नक्की टाळा –
तेलकट, मसालेदार आणि प्रक्रिया केलेले पदार्थ, तीव्र सूर्यप्रकाशात जाणे, वारंवार पिंपल्सना स्पर्श करणे, मेकअप तसाच ठेऊन रात्री झोपणे.
त्वचेची काळजी घेताना या गोष्टींकडे लक्ष ठेवा.
* दिवसातून ३ ते ४ वेळा चेहरा स्वच्छ धुवा.
* हळद आणि चंदनाचा लेप – कांतिवर्धनासाठी
* नीम आणि चंदन याचा लेप – पिंपल्सची सूज कमी करण्यासाठी आणि रक्त शुद्धीसाठी.
* हळद + लिंबाचा रस – चेहऱ्यावरील डेड स्किन काढून टाकण्यासाठी.
* जायफळाचा लेप – पिंपल्सचे व्रण – डाग कमी करण्यासाठी
टीप: कोणताही उपाय करण्यापूर्वी त्वचेवर थोड्या भागात लावून जळजळ होत नाही ना ते पहा.
आयुर्वेदिक औषधे –
* वाळ्याचे सरबत – स्ट्रेस आणि पित्त कमी करण्यासाठी
* आवळ्याचा आहारात वापर – रक्त शुद्ध करून त्वचेची रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी
* शतावरी + अश्वगंधा + अशोक – हार्मोन्सची पातळी नॉर्मल ठेवण्यासाठी.
* गुडुची/ गुळवेल – रक्त शुद्ध करण्यास मदत करते.
* त्रिफळा चूर्ण – आतड्यांची स्वच्छता राखते.
*टीप: वर उल्लेख केलेली कोणतीही आयुर्वेदिक औषधे घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
डॉ. नयना प्रवीण घाडीगावकर.
BAMS PGDEMS.
डिसीज रिव्हर्सल एक्स्पर्ट
माधवबाग ठाणे वसंत विहार
९८१९२७२०६६.