शहापूर: मागील काही दिवस सुरु असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे तालुक्यातील मुंबई महानगर पालिकेचे तानसा धरण बुधवारी पहाटे ओसंडून वाहू लागले.
आतापर्यंत सहा दरवाजांद्वारे ६५३१ क्यूसेक्स प्रती सेकंद पाण्याचा विसर्ग तानसा नदी पात्रात केला जात असल्याची माहिती तालुका आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाकडून देण्यात आली. मुंबई आणि उपनगरांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांपैकी तानसा धरण ओसंडून वाहू लागल्याने मुंबईची पाणी कपात रद्द होण्याची शक्यता आहे.
शहापूर, भिवंडी, वाडा तालुक्यातील आणि धरणाखालील गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.