माणूस कितीही सुंदर दिसत असला तरी डोळ्यांखाली असणारी काळी वर्तुळे संपूर्ण सौंदर्य बिघडवू शकतात. बऱ्याचदा डार्क सर्कल्स असलेल्या व्यक्ती यासाठी वेगवगेळे उपचार करत असतात मात्र, कितीही उपाय केले तरी डार्क सर्कल्स कमी होत नाहीत. डोळ्यांखालची काळी वर्तुळे ही केवळ महिलांसाठीच नव्हे तर पुरुषांसाठीही मोठी समस्या आहे. जास्त वेळ स्क्रीन पाहणे, खूप कमी झोप, तणाव आणि इतर अनेक कारणांमुळे ही समस्या उद्भवू शकते.
डार्क सर्कल (डोळ्याखाली होणारी काळी वर्तुळे) सर्व वयोगटातील लोकांमध्ये दिसून येते. डार्क सर्कल होण्यामागे सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे शरीरात असलेली लोहाची कमतरता, ज्याला अनिमिया असेही म्हटले जाते. डार्क सर्कल येण्यामागची प्रमुख कारणे :-
– शरीरातील हिमोग्लोबिन कमी झाल्याने डार्क सर्कलचा त्रास संभवतो.
– ऑक्सिजन कपॅसिटी कमी झाल्याने त्वचा काळवंडते.
– बी१२, d३ जीवनसत्वाची कमतरता असणे.
अपुरी झोप सुद्धा डार्क सर्कल येण्यास कारणीभूत ठरते. डार्क सर्कल असलेल्यांनी लोहयुक्त पदार्थ खाणे महत्वाचे आहे. यात हिरव्या पालेभाज्या, खजूर, गूळ इ. पदार्थांचा समावेश आहारात रोजच्या जेवणात असणे महत्वाचे आहे. हिमोग्लोबिनची जास्त कमतरता असल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घेणे महत्वाचे आहे. वरचेवर डार्क सर्कलवर लावायच्या अनेक क्रिम बाजारात उपलब्ध आहेत परंतु कोणत्याही क्रिमचा वापर स्वमर्जीने न करता वैद्यकीय सल्ल्ला घेणे जास्त फायद्याचे ठरते.
आयटी प्रोफेशन सारख्या अनेक क्षेत्रात सतत स्क्रिनसमोर बसून काम करावे लागते. सामान्यतः सारखं स्क्रिनसमोर बसणाऱ्या लोकांना ड्राय आईजचा त्रास संभवतो. त्यांना काही प्रमाणात आय ड्रॉप्स, आय लुब्रीकंटचा वापर केला तर डोळ्यांना आराम मिळतो. स्क्रिनसमोर बसून सतत काम करणाऱ्यांनी दर २० मिनिटांनी २० सेकंदांसाठी डोळ्यांची हालचाल करणे आवश्यक आहे.
बऱ्याच वेळेला डोळयांच्या खाली खड्डा असलेला जाणवतो. काही लोकांना वजन कमी झाल्यावर हा बदल जाणवतो याला वैद्यकीय भाषेत टीयर ट्रफ डिफॉर्मटी असे म्हणतात. खड्ड्यामुळे येणाऱ्या डार्क सर्कलला बरे करण्यासाठी वैद्यकीय उपचाराची गरज असते. डोळ्यांखाली दिसणारे हे खड्डे हायलोरानिक ऍसिड फिलरच्या साहाय्याने हे डार्क सर्कल भरून काढले जातात. अनेकदा नियमित पौष्टिक आहाराने व औषधाने डार्क सर्कल पासून सुटकारा मिळतो. डार्क सर्कलचे प्रमाण जास्त असेल तर मात्र लेझरचा उपयोग उपचारासाठी करावा लागतो.