माजी नगरसेवकावर तडीपारीची टांगती तलवार

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे कळवा येथील माजी नगरसेवक महेश साळवी यांना ठाणे पोलिसांनी तडीपारीबाबत नोटीस बजावली आहे. त्यांच्याविरोधात मारहाण आणि राजकीय गुन्हे दाखल आहेत.

तडीपारीची कारवाई का करण्यात येऊ नये, याबाबत महेश साळवी यांच्याकडून ठाणे पोलिसांनी स्पष्टीकरण मागितले आहे. त्यामुळे साळवी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महेश साळवी हे कळवा भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक होते.

डिसेंबर २०२३ मध्ये महेश साळवी यांना ठाणे पोलिसांनी तडीपारीची नोटीस बजावली होती. मंगळवारी साळवी यांनी ही नोटीस स्विकारली आहे. येत्या दोन दिवसांत त्यांच्याकडून नोटीसला उत्तर अपेक्षित असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे महेश साळवी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.