स्वाईन फ्लुचे रुग्ण दोन दिवसांत दुप्पट

ठाणे : कोरोना संसर्गाचा आलेख खाली येत असताना स्वाईन फ्लुने मात्र वेग घेतला आहे. अवघ्या दोन दिवसात रुग्णसंख्येत दुप्पट वाढ झाल्याचे दिसत आहे. बुधवारी स्वाईन फ्लुच्या रुग्णांची संख्या ३४ एवढी होती. मात्र गुरुवारी ही संख्या थेट ६६ वर पोहचली आहे.

बुधवारी ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्लुच्या बाधित रुग्णांची संख्या ३४ होती. तर तीन जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, गुरुवारी जिल्ह्यात स्वाईन फ्लुच्या रुग्णांची संख्या थेट ६६ वर गेली आहे. सुदैवाने मृत्यू मात्र वाढले नाहीत.

ठाणे महापलिका हद्दीत स्वाईन फ्ल्यूचे सर्वाधिक ४० रुग्ण झाले असून।त्यापाठोपाठ कल्याण डोंबिवली पालिकेत रुग्णांची संख्या नऊवरून १८ इतकी झाली आहे. नवी मुंबईत दोन रुग्णांची वाढ झाल्याने तेथील रुग्णांचा आकडा पाचवर गेला आहे. बुधवारपर्यंत एकाही रुग्णांची नोंद नसलेल्या मीरा-भाईंदरमध्ये एका रुग्णाची नोंद झाली आहे. कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागला असताना वाढत्या स्वाईन फ्ल्यूने चिंता वाढू लागली आहे.