कल्याण : मंगळवारी कल्याण पूर्वेतील सप्तशृंगी इमारतीतील स्लॅब कोसळून घडलेल्या भीषण दुर्घटनेने पालिका प्रशासन हादरून गेले असताना पालिकेच्या आपत्कालीन विभागात कार्यरत असलेला लिपिक घटनेच्या वेळी गैरहजर होता. या घटनेची कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने गंभीर दखल घेत आपत्कालीन कक्षाचे कर्मचारी लिपिक योगेश पाटील गैरहजर आढळल्याने त्यांचे निलंबन केल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी दिली.