लोकशाहीचे तथाकथित रक्षणकर्ते, अर्थात आपल्या महन्मंगल देशाचे राज्यकर्ते त्यांचा राजकीय प्रवास सुरू करतात, असे उद्दार दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी काढले होते. त्यांचे हे विधान आजही जेव्हा-जेव्हा राजकारणातील पैशांचे वाढते प्राबल्य आणि त्याचा निवडणुकीत होणारा वापर या विषयांवर लिहिले-बोलले जाते तेव्हा आवर्जून उल्लेख होत असतो. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तीनी एकमुखाने राजकीय पक्षांकडून जमा केल्या जाणाऱ्या निवडणूक फंडाची प्रचलित पद्धत रद्द केली आणि पुन्हा एकदा राजकारणातील पैशांच्या सुळसुळाटीचा मुद्दा सार्वजनिक चर्चाविश्वात अग्रक्रमी आला.