सनी लिओनीला ‘नवरोबा’ची भुरळ

‘कन्नी’ या चित्रपटाची सध्या महाराष्ट्रभर चर्चा सुरु आहे. चित्रपटाच्या टिझर, ट्रेलर आणि गाण्यांनी अनेकांना वेड लावले आहे. प्रत्येक गाण्याचा जॉनर वेगळा असून सगळ्याच गाण्यांवर संगीतप्रेमी प्रेम करत आहेत. यातील विशेष गाजलेले गाणे म्हणजे ‘नवरोबा’. या गाण्यावरील अनेक रील्स सध्या व्हायरल होत आहेत. यातील हूकस्टेपही प्रचंड गाजत आहे आणि याचीच भुरळ बॉलिवूडच्या सनी लिओनीला पडली आहे. ‘नवरोबा’ गाण्यावरील सनीचे हे नृत्य सोशल मीडियावर प्रचंड गाजतेय. सनी हे गाणे एन्जॉय करतेय,असे एकंदर तिच्या चेहऱ्यावरून दिसतेय.

दरम्यान,  समीर जोशी लिखित, दिग्दर्शित ‘कन्नी’ चित्रपट येत्या ८ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात ऋता दुर्गुळे, अजिंक्य राऊत, शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.  या चित्रपटाची निर्मिती अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी यांनी केली आहे.